कराड : राज्यभरातील चित्रपटगृहांत गाजत असलेल्या ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटाचे खेळ एका दाक्षिणात्य चित्रपटासाठी बंद करण्यात आलेत. हा मराठी अस्मितेसह मराठी चित्रपटसृष्टीवर घाला असून, हा चित्रपट तत्काळ सर्वत्र प्रदर्शित न झाल्यास दाक्षिणात्य चित्रपटांचे खेळ बंद पाडू, असा इशारा आस्था सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष स्वाती पिसाळ यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कराडमध्ये पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. मानव परिवर्तन- विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष राधिका पन्हाळे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल घराळ, शिवसेनेचे (शिंदे) शहराध्यक्ष राजेंद्र माने आदींची उपस्थिती होती.

हेही वाच – Sharad Pawar : मी काय चुकीचं केलं? मारकडवाडीतील ग्रामस्थांसमोरच शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल

स्वाती पिसाळ म्हणाल्या, अवघ्या विश्वाचे आराध्यदैवत छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम, त्यांचे हिंदवी स्वराज्यासाठीचे बलिदान हे युवा पिढीसमोर येणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणे अत्यावश्यक आहे. परंतु, कराडसह महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरला असतानाही तो बंद करून एक दाक्षिणात्य चित्रपट बहुतांश चित्रपटगृहांत दाखविला जात आहे. त्यामुळे नागरिकांसह शिव, शंभूप्रेमींमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याने हे दाक्षिणात्य चित्रपट बंद पाडणार असल्याचा इशारा पिसाळ यांनी दिला.

हेही वाचा – Markadwadi : “मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा पेटला पाहिजे”, शरद पवारांसमोरच महिलांनी एल्गार पुकारला!

छत्रपती संभाजी महाराज चित्रपट सिनेमागृहात बंद करण्याचा निर्णय एका दाक्षिणात्य चित्रपटासाठी चित्रपट वितरण गटाने (फिल्म डिस्ट्रीब्यूटर लॉबी) घेतला. ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याने अखंड महाराष्ट्रातील जनता या प्रकाराचा जाहीर निषेध करत आहे. त्यामुळे हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करावा, अशी आमची मागणी आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी यांना देण्यात आल्याचे स्वाती पिसाळ यांनी या वेळी सांगितले.