वाई: पुणे बंगळुरू महामार्गावर अनवडी (ता वाई) गावच्या हद्दीत भरधाव मोटारीने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. मंदार रामचंद्र कोल्हटकर (वय् ४४, मंगळवार पेठ सातारा) व धीरज बाळासाहेब पाटील (मुळगाव वाळवा सध्या राहणार सातारा) अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही एका वर्तमानपत्राचे वितरण विभागाचे कर्मचारी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – माढ्यात महाविकास आघाडीविरुद्ध प्रा. लक्ष्मण हाके यांची बंडखोरी, महात्मा फुलेंच्या वेशभूषेत भरली उमेदवारी

खंडाळ्याकडून साताऱ्याला येत असताना हा अपघात झाला. महामार्गावर अनवडी गावच्या हद्दीत तीव्र उतारावर मागून आलेल्या भरधाव मोटारीने (एम एच ०९ डी एम ८१६६) दुचाकीला (एम एच ११ बीजी८८०६) मागून जोरदार धडक दिली. यामध्ये मंदार व धीरज हे दोघेही गाडीच्या पुढील भागावर आदळले व तेथून हवेत उडून पुन्हा दुभाजकावर पडल्याने गंभीर जखमी झाले.

हेही वाचा – सांगलीत कॉंग्रेस, उबाठा शिवसेनेत मनोमिलन ?

मोटार चालक विजय पूनमचंद शह ( वय ७५, कोल्हापूर) यांनी जखमीला प्रथम कवठे येथे व नंतर एकाला सातारा येथे जिल्हा रुग्णालयात व दुसऱ्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वी दोघांचाही मृत्यू झाला होता. घटनास्थळी भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गरजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत कार्य करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास हवालदार एकनाथ माने करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara two people died after four wheeler hit bike ssb
Show comments