कराड : कराड शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी अखेर ब्रिटीशकालीन कोयना नदीवरील जुन्या पुलावरून जलवाहिनी टाकण्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून डी. पी. जैन कंपनीच्या मदतीने संबंधित ठेकेदाराने जलवाहिनीचे काम सुरू केले आहे. सदरचे काम सातच दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

पुणे- बंगळुरू महामार्गाच्या रुंदीकरण कामात कराडच्या कोयना पुलालगत नवा पूल उभारण्याच्या कामासाठी भराव घालून काम सुरु होते. त्यात भरावामुळे चिंचोळा झालेला नदीचा प्रवाह आणि पावसाच्या पाण्याच्या दाबामुळे येथील कराड शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहीनीच वाहून गेल्याने कराडकरांचे पाण्यासाठी हाल झाले. त्यावर तात्पुरता पर्याय झाला असलातरी हा प्रश्न कायम मार्गी लागावा म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन, महामार्ग सुसज्जीकरण ठेकेदार आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे प्रयत्न सुरु होते.

if congress in power will cancels adani contract
धारावी प्रकल्प रद्द करणार! काँग्रेसचा ‘मुंबईनामा’ जाहीर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
india sets conditions for elon musk s starlink satellite licence approval
एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ला भारतीय अवकाश खुले; मात्र परवाना नियम-शर्तींच्या पूर्ततेनंतरच केंद्रीय मंत्र्यांचे प्रतिपादन
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त

हेही वाचा – सातारा : जोरधार आठव्या दिवशीही सुरूच; कोयनेचा धरणसाठा ७१ टीएमसी; रस्ते खचले, बंधारेही वाहून गेले

दरम्यान, सध्याच्या जुन्या जॅकवेलमधून कराड शहराला पूर्ण क्षमतेने व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने हा पाणीपुरवठा कायम ठेवताना पर्याय म्हणून जुन्या कोयना पुलावरून जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदर कामासाठी प्रत्यक्ष जलवाहिन्या दाखल झाल्या आहेत.

हेही वाचा – “बेटा अजित कितना खाया? सरदार ७० हजार कोटी”; विजय वडेट्टीवारांची पंतप्रधान मोदी आणि अजित पवारांवर टीका

महामार्गावर कोयना पुलानजीक असलेल्या पलाश मंगल कार्यालयासमोरून ही जलवाहिनी जोडून ती जुन्या पुलावरून डाव्या बाजूने जॅकवेलपर्यंत टाकण्यात येणार आहे. साधारण हे काम सात दिवसांत केले जाणार असल्याने कराड शहराचा पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने होण्यास मदत होईल असा विश्वास दिला जात आहे.