साताऱयाच्या प्रियांका मंगेश मोहिते हिने बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजता जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले. कर्नल नीरज राणा यांच्या नेतृत्त्वाखाली गेलेल्या संघातून तिने हे यश मिळवले. प्रियांकाला पदभ्रमणाची आणि नृत्याची विशेष आवड आहे. त्यातूनच पुढे तिने एव्हरेस्ट सर करण्याचा निश्चय केला होता. त्याला बुधवारी सकाळी मूर्त रूप आले. गेल्या आठवड्यातच गिरीप्रेमीच्या गणेश मोरे, आनंद माळी आणि भूषण हर्षे यांनी एव्हरेस्ट सर केले होते.

Story img Loader