Satej Patil On Municipal Elections 2025 : महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीत अपयशाला समोरं जावं लागलं. विधानसभेच्या निवडणुकीतील अपयशाची कारणं काय? याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विचारमंथन करण्यात येत आहे. मात्र, यातच आघाडीतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्यामुळे महाविकास आघाडी तुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ही चर्चा असतानाच काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाने आगामी महापालिकेच्या निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे महाविकास आघाडीबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, ठाकरे गटाने महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याच्या संकेतामुळे काँग्रेस काय भूमिका घेणार? काँग्रेसही या निवडणुका स्वबळावर लढणार की आघाडीत लढणार? याबाबत वेगवेगळे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. यावर आता काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी सूचक विधान केलं आहे. ‘शक्य असेल तिथे आघाडी करू, तसेच काँग्रेस म्हणून महापालिकेच्या निवडणुका ताकदीने लढणार आहोत’, असं सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. ते साम टीव्ही या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

सतेज पाटील काय म्हणाले?

आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीत लढणार की स्वतंत्र? यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता सतेज पाटील यांनी म्हटलं की, “जिथे शक्य असेल तिथे म्हणजे एखाद्या जिल्ह्यात आघाडी करणं शक्य असेल तर आघाडी केली पाहिजे. कारण महायुतीचा पराभव होणं गरजेचं आहे. महायुतीच्या पराभवासाठी आम्ही काँग्रेस म्हणून जी पावलं उचलली पाहिजे ती पावलं काँग्रेस उचलेल. मग जिथे जिथे शक्य होईल तिथे आम्ही एकसंघपणे लढायला उतरणार आहोत. मात्र, पक्ष म्हणून आम्ही आगामी महापालिकेच्या निवडणुका ताकदीने लढणार आहोत”, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे का?

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांवर सतेज पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले, “आता आमच्यासाठी सर्वात महत्वाचं हे आगामी महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकीत आम्ही ताकदीने कसं लढता येईल? हे महत्वाचं आहे. महाविकास आघाडी म्हणून आमची भूमिका काय असेल? त्यामुळे मी म्हटलं की ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी आम्ही आघाडी करणार आहोत, तसेच ज्या ठिकाणी शक्य नसेल त्या ठिकाणी आम्ही काँग्रेस म्हणून ताकदीने निवडणुका लढवू. कारण आमची लढाई ही महायुतीबरोबरची आहे. त्यामुळे आम्हाला या निवडणुकीत एकत्रित लढणं अपेक्षित आहे. तसेच काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे किंवा नाही? यावर मी बोलणं संयुक्तिक ठरणार नाही”, असंही सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं.