सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील साटेली गावात मायनिंग उत्खनन बंद करण्यास ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. तोही प्रशासन जुमानत नाही तसेच इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर करण्यात आला असताना अद्याप लागू करण्यात आला नसल्याचे कारण पुढे करून बिनधास्त उत्खनन सुरू असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामसभेला पंचायत राज मध्ये अधिकार दिले आहेत ते पायदळी तुडवीले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

डेक्कन मिनरल्स कंपनी प्रा.लि व ग्रामस्थ साटेली तर्फ़ सातार्डा यांच्या मध्ये दि ८ मे१९९३ रोजी च्या कराराने सुरु असलेला उत्खनन व्यवसाय १० वर्षा पुर्वीच बंद केलेला असताना पुन्हा ४ नोव्हेंबर २०२४ पासुन कंपनीने अवैद्यरीत्या मायनिंग उत्खनन चालू केलेले आहे आवश्यक असणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय, गाव व इतर शासकीय कार्यालयांच्या पुर्वपरवानगी घेतलेल्या नाहीत. उत्खनन सुरु असलेल्या जागेमध्ये बेसुमार वृक्ष तोड केलेली जात आहे मायनिंग उत्खनन हे पूर्णतः अनधिकृत आहे.मायनिंग कंपन्यांनी गावात रोजगार उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली होती त्यामुळे ग्रामस्थांनी माल वाहतुकीसाठी डंपर व तत्सम वाहने खरेदी केली. परंतु त्यांना रोजगार न दिल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे या सर्व कारणांमुळे साटेली तर्फ सातार्डा ग्रामसभेने व ग्रामस्थांनी सर्वानुमते, साटेली तर्फ सातार्डा या गावातील मायनिंग उत्खनन व मायनिंग वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात यावे.असा ठराव ग्रामसभेत एकमताने पारीत केला आहे. 

या ठरावाला सुचक-अजित हरीश्चंद्र कांबळी यांनी तर अनुमोदन सचिन सखाराम कळंगुटकर यांनी दिले आणि हा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. या ग्रामसभेत ४८ ग्रामस्थांची उपस्थिती होती. सदर गाव हा जैवविविधता दृष्ट्या संवेदनशिल म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. वृक्ष तोड केल्यामुळे वाघ बिबटे यांसारखे हिंसक प्राणी लोकवस्त्यांमध्ये शिरकाव करत आहे. मायनींग उत्खनित केलेली माती ही आजुबाजुच्या परीसरात डंप करुन ठेवली जाते. त्यामुळे ती पावसाच्या पाण्या बरोबर नदी विहीरी यामध्ये मिसळत आहे. पाण्याचे झरे बंद झालेले आहेत. त्यामुळे भविष्यात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. उत्खनन क्षेत्राच्या परीसरात ग्रामस्थांच्या काजु, नारळ, पोफ़ळी यांच्या फ़ळबागा व शेत जमिनी आहे. सदर रासायनयुक्त माती शेत जमिनीत व फळबागेत शिरल्याने जमिन नापिक होत आहेत व शेतकऱ्यावर फळबागायतदारांवर उपासमारीची वेळ येणारी आहे.

दरम्यान मायनिंग उत्खनन करताना नियम, कायदा धाब्यावर बसवून ठेवले आहेत. त्यामुळे सध्या गाजत असलेल्या बीड येथील राखे सारखाच खनिज मातीचा धंदा सुरू आहे असे ग्रामस्थांनी सांगितले. अनधिकृत उत्खनन करताना अटी व शर्ती धाब्यावर बसविण्यात आले आहेत याकडे जिल्हाधिकारी जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याची टीका ग्रामस्थांनी केली आहे.

Story img Loader