सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाला सोमवारपासून पावसाने पुन्हा झोडपायला सुरुवात केली आहे. जिल्ह्य़ात सरासरी १००.५८ मिमी एवढा पाऊस आज सकाळी नोंदला असून १ जूनपासून आजपर्यंत एकूण ९१८१.८२ मिमी एवढा पाऊस कोसळला.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात यंदा हंगामाचा पाऊस वेळीच दाखल झाला. पावसाने आगमनापासून अतिवृष्टी सुरू केली, तो गेले चार दिवस थोडा थांबला होता, पण काल सोमवारपासून धुवाधार आगमन झाले. आज मंगळवारी पावसाने सर्वत्र झोडपले. यंदा पावसाने सरासरी ओलांडत विक्रमी नोंद केली आहे. १ जूनपासून पावसाची नोंदणी सुरू झाली तिथपासून आजपर्यंत जिल्ह्य़ात ९१८१.८२ मिमी एवढा पाऊस कोसळला. नदीनाल्यांना पूर आला, पण दुर्दैवी घटना या हंगामात घडल्या नाहीत.
कालपासून कोसळलेला ८०४.६० मिमी म्हणजेच सरासरी १०१.५८ मिमी पावसाने विक्रमच घडविला. आज दिवसभर तो कोसळतच होता. मालवणमध्ये सर्वाधिक १७१ मिमीची नोंद झाली. त्याखालोखाल देवगड १२७ मिमी, कुडाळ ११३ मिमी, कणकवली ८६ मिमी, सावंतवाडी ८३ मिमी, दोडामार्ग ८२ मिमी, वेंगुर्ले ९१.६० मिमी व वैभववाडी ५१ मिमी एवढी नोंद झाली. कालपासून कोसळणाऱ्या पावसाची सर्वाधिक नोंद सागरकिनाऱ्यालगतच्या मालवण, देवगड तालुक्यांत झाली आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा