लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिबाग : विनोबा भावे यांच्या गागोदे गावात मोफत शिक्षण हक्कासाठी सत्याग्रहाला सुरवात झाली आहे. सत्यशोधक सर्वोदय संघटनेच्या माध्यमातून हा सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गागोदे या गावात विनोबा भावे यांचा जन्म झाला. भूदान चळवळीचा पाया घालणाऱ्या आचार्य विनोबा भावे यांच्या जन्मगावी आज पासून गावकरी सत्याग्रहाला बसले आहेत. विनोबांच्या स्मारकात त्यांनी हा सत्याग्रह सुरू केला आहे. समाजातील सर्व घटकातील विद्यार्थ्यांना पदवी पर्यंत मोफत शिक्षण मिळावे, जिल्हा परिषद व नगर परिषदांमधील शाले शिक्षणाचा दर्जा उंचवावा, कंत्राटी शिक्षक पध्दती बंद करून कायम शिक्षकांची नियुक्ती व्हावी, दत्तक शाळा धोरण रद्द करावे, १ ली ते आठवी नापास न करण्याचे धोरण रद्द करावे, सेमी इंग्लिश शाळांची संख्या वाढवावी, हंगामी स्थलांतरीत होणाऱ्या पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुरू करावे, कंत्राटी कामगार कायदा रद्द करावा. रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी हा सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. संदीप परशुराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

सर्वांना चांगले आणि मोफत शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. मात्र खाजगी शाळांची फी सामान्य माणसांना परवडणारी नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून दूरावतात. हीबाब लक्षात घेऊन देशात पहिली ते पद्वीत्तर पदवी पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जावे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. त्यांच्या सोबत गावकरीही या सत्याग्रह आंदोलनात सहभागी झाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satyagraha for free education in vinoba bhaves gagode village mrj