काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी अलीकडेच नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. सत्यजीत तांबेंनी बंडखोरी केल्यानंतर काँग्रेस हायकंमाडने त्यांना निलंबीत केलं आहे. पण त्यांनी अपक्ष उमेदवार उभं राहून निवडणूक जिंकली आहे. या सर्व घडामोडींनंतर सत्यजीत तांबे यांनी होळीनिमित्त काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना खास सल्ला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

होळीनिमित्त राहुल गांधींना काय शुभेच्छा द्याल? असं विचारलं असता सत्यजीत तांबे म्हणाले, “राहुल गांधींना होळीच्या शुभेच्छा देताना मी एवढंच सांगेन की, राहुलजींनी आणखी लोकांमध्ये मिसळून काम करायला हवं. भारत जोडो यात्रेतून त्यांनी हे केलंच आहे. पण अजून त्यांनी लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. लोकांमध्ये आलं-गेलं पाहिजे. यामुळे लोकांच्या मनातील कटू भावना दूर झाल्या पाहिजेत.”

हेही वाचा- Video: “…म्हणून आम्ही कुलूप तोडलं”, ठाण्यातील शिवसेना शाखेवर ताबा घेतल्यानंतर नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया

“विरोधक असो वा सत्ताधारी असो, एकत्र येऊन त्यांनी या देशासाठी कसं चांगलं काम करता येईल, हे आताच्या पिढीतील लोकांना पाहायचं आहे. भारतीय जनता पार्टीने काय केलं? हे ऐकण्यात आता कुणालाही रस राहिला नाही. आपण काय करणार आहोत? पुढे तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही काय करणार आहात? हे ऐकण्यात देशातील जनतेला खऱ्या अर्थाने रस आहे. मला असं वाटतं की जुनं ते सगळं सोडून आपण काय करू शकतो, यावर त्यांनी काम करायला हवं, असं मला वाटतं. बुरा न मानो होली है!” असा सल्ला सत्यजीत तांबेंनी राहुल गांधींना दिला आहे. ते ‘मुंबई तक’शी बोलत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satyajeet tambe give advice to congress mp rahul gandhi on holi festival greetings rmm
Show comments