विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमुळे मुंबईसह आजूबाजूच्या शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच मुसळधार पावसामुळे वाहतूक मंदगतीने सुरू असते. अशावेळेस मुंबईकरांना लोकल सोयीची वाटते. लोकल ट्रेनविषयी असलेला हा जिव्हाळा फक्त सर्वसामान्य नोकरदार वर्गालाच नव्हे तर आमदारांमध्येही निर्माण झाला आहे. विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांना लोकलचा प्रवास करणं भाग पडल्याने त्यांनी पालघरपासून पनवेलपर्यंत आणि कल्याण-डोंबिवलीपासून मुंबईपर्यंतच्या जनतेच्या सहनशीलतेचं कौतुक केलं आहे. काल रात्री उशिरा त्यांनी ट्वीट करत त्यांच्या मुंबई प्रवासाची कहानी कथन केली.

विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे पावसाळी अधिवेशनाच्या सत्रात उपस्थित राहण्यासाठी नाशिकहून निघाले होते. परंतु, नाशिक-मुंबई महामार्गावर भिवंडी येथे ३-४ तासांची वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने त्यांनी लोकलने मुंबईपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. परंतु, भिवंडीपासून कल्याण गाठेपर्यंतही त्यांना तीन तासांचा वेळ गेला. अखेर त्यांनी कल्याणहून मुंबईला जाण्यासाठी लोकल पकडली. हा संपूर्ण प्रवासगोंधळ त्यांनी ट्वीटद्वारे सांगितला आहे.

motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी

हेही वाचा >> खड्ड्यांमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर कोंडी; भिवंडीतील रांजनोली नाका ते ठाण्यातील तीन हात नाकापर्यंत वाहनांच्या रांगा

“दुपारपासून संगमनेरवरुन मुंबईला अधिवेशनास उपस्थित रहाण्यासाठी निघालो. नाशिक-मुंबई हायवे वर भिवंडी येथे ३-४ तास ट्रॅफिकमध्ये अडकलो, शेवटी एका मित्राने सल्ला दिला की, कल्याणवरुन लोकल ट्रेनने लवकर पोहोचशील, मग काय भिवंडी बायपासवरुन कल्याणच्या दिशेने प्रवास सुरु झाला, तेथेही ३० मिनिटांच्या प्रवासाला ३ तास लागले व अखेर आता ट्रेनने मुंबईकडे निघालोय,” असं त्यांनी रात्री पावणे अकराच्या सुमारास ट्वीट केलं.

“खरंतर आज माझा मुंबई महानगर प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या पालघरपासून पनवेलपर्यंत तर कल्याण-डोंबिवलीपासून मुंबईपर्यंतच्या जनतेविषयी प्रचंड आदर वाढलाय, किती सहनशील जनता आहे!, असं म्हणत त्यांनी सामान्य नोकरदारवर्गाचं कौतुक केलं आहे. तर, “मुंबईच्या अवतीभवती पायाभूत सुविधांचा पुरा बोजवारा उडालाय, माणसाची जीवनशैलीची ऐशी की तैशी झालीय, पण आपली सहनशिलता अजूनही संपायचे नाव घेत नाही”, असंही ते म्हणाले.

दरम्यान, मुंबई विधानभवनात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा दुसरा आठवडा काल सोमवारपासून सुरू झाला असून दोन्ही सभागृहात विविध मुद्द्यांवर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले आहेत. तर, दुसरीकडे मुंबईसह विविध ठिकाणी तुफान पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिणामी त्याचा वाहतुकीवरही परिणाम होत आहे. पावसाचा फटका लोकल सेवेलाही बसतो. परंतु, ही सेवा पुन्हा पूर्ववत होते. त्यामुळे सामान्य नागरिकांसह अनेकजण लोकल प्रवासालाच पसंती देतात.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय?

सत्यजित तांबे यांच्या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, “दादा सर्व सामान्यांच्या जीवनातील अतिशय जिव्हाळ्याचा असणारा प्रश्न आपण उपस्थित केला आहे निश्चितपणे येणाऱ्या काळात मुंबई शहर तसेच मुंबई उपनगराशी निगडित असणाऱ्या असंख्य लोकांना आपल्या ह्या प्रवासामुळे न्याय भेटेल. तसेच हा प्रश्न आपण विधिमंडळात उपस्थित करावा अशी आपणास विनंती.”

“मुंबईकर खूप सहनशील आहेत, यात प्रश्नच नाही. ज्या मुंबई AC लोकल मध्ये तुम्ही प्रवास करता आहात त्यासाठी बऱ्याच विरोधी पक्षाच्या लोकांनी विरोध केला होता. तरीही सरकारने मुंबईकरांना AC ट्रेन, मेट्रोच्या रुपात बरेच सहकार्य केले आहे आणि पुढेही करतील हीच अपेक्षा”, असंही एका युजरने म्हटलं आहे.