कर्जत शहरामध्ये सर्वसामाजिक संघटना यांच्या माध्यमातून सलग १०० दिवस झाले शहरांमध्ये वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनासाठी रोज सकाळी एक तास श्रमदान करून अखंड कार्य सुरू आहे. शहरामध्ये एक लाखापेक्षा जास्त वृक्ष या संघटनेच्या पुढाकारातून लावण्यात आले असून त्याचे संवर्धनाची काम देखील चांगल्या पद्धतीने सुरू आहे.पानी फाउंडेशनचे सीईओ  सत्यजित भटकळ सर यांनी आज कर्जत येथे भेट देऊन सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्याची पाहणी केली.

महाराष्ट्रामध्ये पानी फाउंडेशनच्या माध्यमातून मोठी क्रांती घडवून आणणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाने सर्व सामाजिक संघटनेच्या पर्यावरण संवर्धन कार्याची तोंड भरून स्तुती केली,अगदी मनापासून सर्व शिलेदारांचे कौतुक केले व पुढील काळामध्ये असंच काम करत राहा पानी फाउंडेशनची टीम नेहमी तुमच्या पाठीशी असेल अशी ग्वाही दिली.सत्यजित भटकळ यांनी केलेल्या कौतुकामुळे व कायम पाठीशी राहण्याच्या शब्दामुळे पुढे काम करण्याची आणखी ऊर्जा मिळाली या सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांना मिळाले आहे.यावेळी पानी फाउंडेशनची टीम देखील उपस्थित होती. सर्वसामाजिक संघटनेच्या शिलेदारांनी केलेल्या सर्व कामाची पाहणी या समितीने केली.

Story img Loader