“सावरकर म्हणायचे की बलात्कार हे राजकीय हत्यार आहे, ते आपल्या विरोधकांच्या विरोधात वापरा”, असं विधान काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे काँग्रेस आणि भाजपात पुन्हा शाब्दिक युद्ध होण्याची शक्यता आहे. यातच, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी शिवानी वडेट्टीवार यांच्यावर पलटवार केला आहे. “सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात हे विधान मला दाखवावं”, असं थेट आव्हानच त्यांनी केलं आहे. तसंच, त्यांनी यावेळी काँग्रेसवरही टीका केली आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“शिवानी वडेट्टीवार यांनी केलेलं विधान अत्यंत चुकीचं आहे. सावरकरांनी असं कुठलंही वाक्य ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात लिहिलेलं नाही. त्यांनी ते विधान मला दाखवावं. असं कोणतंच वाक्य पुस्तकात नाही. सहा सोनेरी पाने पुस्तक मी वाचलेलं आहे,” असं सात्यकी सावरकर यांनी स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाले की, “मुद्दाम टार्गेट केलं जात आहे. एकतर यांनी अभ्यास केलेला नाही. पूर्ण वाचलेलं नाही. यांचं सल्लागार मंडळ यांना सांगतं की सावरकरांनी एकेठिकाणी असं असं लिहिलेलं आहे, तेव्हा हे स्वतः पडताळूनही पाहत नाहीत”, अशी टीका सात्यकी सावरकर यांनी केली.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Image Of Jwala Gutta And L&T Chairman
“कर्मचाऱ्यांनी पत्नीकडे का पाहू नये?”, ज्वाला गुट्टाचा संताप; ‘L&T’च्या अध्यक्षांविरोधात वाढली टीकेची धार
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”

हेही वाचा >> Video: “सावरकर म्हणायचे बलात्कार हे राजकीय हत्यार”, मुलीच्या विधानावर विजय वडेट्टीवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“सावरकर हिंदुत्ववादी नेते होते. देशात, महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे जे सावरकरांच्या विचारांच्या जवळ जाऊ शकतं. यांची सत्ता गेलेली आहे. ती सत्ता कोणाचं तरी लांगूलचालन करून परत मिळवायचे प्रयत्न सुरू आहेत”, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं.

शिवानी वडेट्टीवार काय म्हणाल्या होत्या?

“हे लोक फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर कधीच मोर्चा काढणार नाहीत. ते सावरकर मोर्चा काढतात. मला आणि माझ्यासह इतर भगिनी महिलांना भीती वाटत असेल. सावरकर म्हणायचे बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. ते तुम्ही तुमच्या विरोधकांच्या विरोधात वापरलं पाहिजे. मग माझ्यासारख्या महिला-भगिनींना सुरक्षित कसं वाटेल? अशा लोकांच्या प्रचारासाठी हे लोक मोर्चा काढतात”, असं शिवानी वडेट्टीवार चंद्रपूरच्या एका कार्यक्रमात म्हणाल्या. शिवानी यांनीच हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटरवरून पोस्ट केला आहे.

विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया काय?

“हा विषय फार गंभीर आहे असं मला वाटत नाही. मी शिवानीला विचारलं की हा कुठला संदर्भ घेऊन तू बोललीस. ती म्हणाली सावरकरांनी लिहिलेलं ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकातला संदर्भ ती सांगत होती. ती पुस्तकाचा आधार घेऊन बोलली असेल, तर त्यावर वाद होण्याचं काही कारण नाही. पण मला माहिती नाही की ती कोणत्या संदर्भात बोलली आहे. ती स्वत: वकील आहे. त्यामुळे तिला वाचनाचाही मोठा छंद आहे. कुठल्यातरी पुस्तकाचा तिने संदर्भ घेतलाय असं तिचं मत आहे. यावर ती अधिक बोलू शकेल”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

Story img Loader