सावंतवाडी : आंबोली सारख्या पर्यटनस्थळी जंगली हत्तींचा वावर काल शनिवारपासून सुरू झाला असल्याने लोकांची तारांबळ उडाली आहे. आंबोली जकातवाडी येथे शनिवारी भात शेतीमध्ये जंगली हत्ती आढळून आला.

आंबोली जकातवाडी व गावठाणवाडी यादरम्यान हिरण्य कशी नदीपात्रामध्ये असलेल्या भात शेतीमध्ये हा हत्ती भात शेतातील भात खात असल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. तात्काळ याबाबतची खबर आंबोली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर आंबोली वन विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले.

या हत्तीला त्या ठिकाणाहून हुसकावण्यासाठी फटाके व टॉर्चच्या माध्यमातून प्रयत्न करत होते. परंतु हा हत्ती रात्री उशिरापर्यंत या ठिकाणाहून गेला नव्हता. रात्री बारानंतर हा हत्ती हिरण्यकशीच्या डोंगराच्या जवळ गेला असल्याचे ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

हत्ती साधारणपणे दहा ते बारा वर्षांचा असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून हा हत्ती तिलारी चंदगड येथून या ठिकाणी आला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे

Story img Loader