सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. एकेकाळी हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून वर्चस्व कायम ठेवले आहे. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर केसरकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले होते. यापूर्वी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. २००९ मध्ये झालेली विधानसभा निवडणूक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून लढवली होती. सावंतवाडीतून ते पहिल्यांदा २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेले होते. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपू्र्वी केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा