सावंतवाडी : माजी आमदार राजन तेली यांनी भाजपा प्राथमिक सदस्यत्व व सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा पत्रात “एकाच कुटूंबाला एक लोकसभा, दोन विधानसभा आणि त्यांच्या कलानेच चालणाऱ्याला तिसऱ्या विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देणे मला योग्य वाटत नाही. ही घराणेशाही मला मान्य नाही”, असे म्हटले आहे. ते आज सायंकाळी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करतील असे बोलले जात आहे.

हेही वाचा : Maharashtra News Live: मध्यरात्रीच्या भेटीगाठी; भाजपाचा मोठा नेता मनोज जरांगेंना भेटल्याची चर्चा, तर्क-वितर्कांना उधाण!

Image of Uttam Jankar
Ajit Pawar : “…तर मी अजित दादांबरोबर जाईन”, शरद पवार यांच्या आमदाराचे मोठे विधान
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Chandrakant Patil On Pune Guardian Minister
Chandrakant Patil : पुण्याचं पालकमंत्रिपद मिळालं तर स्वीकारणार का? चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “माझं नेतृत्व मला…”
Nagpur issue of Massajog Sarpanch Santosh Deshmukhs murder case Dhananjay Munde
अजित पवारांच्या पुढे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्यासाठी घोषणा
vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar : भाजयुमोच्या कार्यकर्त्यांकडून कार्यालयाची तोडफोड झाल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, विजय वडेट्टीवार म्हणाले…
Chhagan Bhujbal on Minister Post
‘मी विधानसभेचा राजीनामा देणार नाही’, छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीत पक्षात चालेल्या राजकारणाबद्दल काय माहिती दिली?
chhagan bhujbal latest marathi news
Chhagan Bhujbal: मंत्रीपद नव्हे, छगन भुजबळांसाठी राज्यपालपद? भाजपा आमदाराचं मोठं विधान; नेमकं घडतंय काय?
Nana Patole, Nana Patole proposal resign,
Nana Patole : नाना पटोलेंकडून अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी, म्हणाले…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांना श्री तेली यांनी राजीनामा पाठविला आहे. या राजीनामा पत्रात म्हटले आहे, भाजपा पक्षात प्रवेश केलेल्या राणे कुटूंबियांचा अंतर्गत होत असलेला त्रास तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक २०१९ ची विधानसभा निवडणूक यामध्ये माझा पराभव करण्यासाठी पक्षाअंतर्गत विरोधक निर्माण करणे (यासाठी साम दाम, दंड, भेद यांचा वापर करणे) पूर्वीच्या या सर्व त्रासाला कंटाळून मी भाजप पक्षात प्रवेश करून पक्ष संघटना वाढीसाठी काम केले. फक्त बांदा शहरापुरती मर्यादित असलेली भाजपा संपूर्ण सावंतवाडी मतदार संघात वाढविण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन अतोनात परिश्रम केले. परंतु, पुन्हा राणे कुटूंबिय भाजपा पक्षात दाखल होऊन आमचे खच्चीकरण करण्याचा तसेच त्यांच्यापासून दूर गेलेल्या सर्वांना त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम राबवित आहे. मी घोटगे सारख्या अत्यंत ग्रामीण भागात सामान्य कुटूंबात जन्मलो. कष्टाने माझी राजकीय कारकिर्द घडवली. ज्या राजकीय पक्षात गेलो, तिथे शंभर टक्के प्रामाणिकपणे काम केले, स्वतःच्या मेहनतीने माणसे जोडली. पण एकाच कुटूंबाला एक लोकसभा, दोन विधानसभा आणि त्यांच्या कलानेच चालणारा तिसरा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देणे मला योग्य वाटत नाही. ही घराणेशाही मला मान्य नाही. याबाबत सातत्याने वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिलेले होते. त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही यामध्ये वरिष्ठांचा नाइलाजही असू शकतो. हे मी समजू शकतो, असे या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

Story img Loader