सावंतवाडी : मालवण मध्ये बांगलादेशी मुसलमान नागरिकांने पाकिस्तान झिंदाबाद, अफगाणिस्तान झिंदाबाद च्या रविवारी घोषणा दिल्याने वातावरण तापले असून भंगार व्यवसाय अनधिकृत बांधकामे उध्वस्त करून देशद्रोह्यांना थारा दिला जाणार नाही असा इशारा दिला आहे. हिंदू नागरिकांनी रस्त्यावर उतरून पोलिस ठाण्यात धडक दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी झालेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्या दरम्यान मालवण वायरी आडवन येथील एका मुस्लिम भंगार व्यावसायिक आणि त्याच्या कुटूंबियांने भारताच्या विरोधात घोषणा देतानाच पाकिस्तान झिंदाबाद , अफगाणिस्तान झिंदाबादचे नारे दिल्याची खळबळजनक घटना घडली याबाबतचे वृत्त रात्री मालवणात वाऱ्यासारखे पसरल्यानंतर रात्रीच काहीनी मालवण आडवन येथे त्या मुस्लिम भंगारवाल्याच्या ठिकाणी ठिकाणी धाव घेत त्या कुटूंबियांना जाब विचारला यावेळी मुस्लीम कुटूंबाने उद्धट उत्तरे देत हिंदू जमावावर चाल करीत शिव्या दिल्या त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदू समाजाने त्या कुटूंबाला चांगलाच प्रसाद दिला

दरम्यान, मुस्लिम कुटूंबाच्या विरोधात सचिन संदीप वराडकर या युवकाने या घटनेची तक्रार मालवण पोलिसांत दिल्यानंतर पोलिसांनी यातील एकाला ताब्यात घेतले आहे एकूणच या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मालवणात संतप्त प्रतिक्रिया उमटून सकल हिंदू समाजाने एकवटत आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मालवण शहरातून विराट मोटरसायकल रॅली काढत मालवण पोलीस स्टेशनला धडक दिली. यावेळी बांगलादेशी मुसलमान भंगार व्यावसायिकावर कारवाई होण्याच्या दृष्टीने हिंदू समाजाच्या व्यक्तींनी पोलिसांकडे मागणी केली. तर यानंतर पोलीस प्रशासन व मालवण नगरपालिका यांच्यावतीने समस्त हिंदू समाज बांधवांच्या उपस्थितीत वायरी येथील त्या भंगार व्यवसायिकाची राहण्याची खोली, शेड, भंगार साहित्य व दोन गाड्या जेसीबीच्या साहाय्याने उध्वस्त करत धडक कारवाई करण्यात आली. यावेळी हिंदू बांधवानी जोरदार घोषणाबाजी करत देशद्रोह्यांना यापुढे मालवणात थारा दिला जाणार नाही असा रोखठोक इशारा दिला.

दरम्यान, आमदार निलेश राणे यांनी प्रशासनास पत्र दिल्यानंतर शहरातील आडवण येथील परप्रांतीय भंगार व्यावसायिकांची अनधिकृत बांधकामे प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. नागरिकांनीही उत्स्फूर्त पाठिंबा देत या कारवाईचे स्वागत केले.