सावंतवाडी : तालुक्यातील पारपोली परिसरात दि.२५ डिसेंबर रोजी रात्री शिकारीला जातेवेळी बंदूक हाताळत असताना चुकून बंदुकीचा चाप ओढला गेल्याने झालेल्या दुर्घटनेत सोबत असलेल्या व्यक्तीच्या पोटात व मांडीत बंदुकीचे शेरे गेल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना पारपोली येथील जंगलात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करून एकाला ताब्यात घेतले आहे.

या दुर्घटनेत कृष्णा अर्जुन गुरव (वय ३५) हा इसम गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी गोवा बांबुळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर याप्रकरणी संशयित वेदांत लक्ष्मण गुरव (२२, रा. गुरववाडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

forest tiger hunt marathi news
वाघाच्या शिकारीचे धागेदोरे सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यापर्यंत !
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
old man attacked with iron rod after dispute over financial affairs of running Bhisi
भिशीच्या वादातून लोखंडी सळईने वृद्धाचा खून; महिलेसह दोघे अटकेत
Interstate gang of asphalt thieves arrested with valuables
डांबर चोरणारी आंतरराज्य टोळी मुद्देमालासह पकडली
Archana Puran Singh Accident
Video : शूटिंगदरम्यान मोडला अर्चना पूरन सिंहचा हात; आईची अवस्था पाहून आर्यमनला कोसळलं रडू
Mumbai, Youth murder , Dharavi, murder,
मुंबई : धारावीत तरुणाची हत्या; तिघांना अटक
Ajit Rajgond sentenced to six days in forest custody may have hunted ten tigers in 11 years
बहेलियांकडून दहा वाघांची शिकार ! ७० लाखांचा व्यवहार !
Police file case against auto driver for dragging cop at mankhurd
पोलिसाला रिक्षासोबत फरफटत नेले; रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल

हेही वाचा : Anjali Damania: “संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कधीच सापडणार नाहीत, कारण त्यांचा…”, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा

याबाबत सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी हवालदार प्रवीण वालावलकर, हवालदार धुरी, दिपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल राजेश नाईक व पोलिस पाटील यांचेसह पारपोली गावात जाऊन गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेतली असून त्यानुसार संशयित वेदांत लक्षण गुरव यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की वेदांत गुरव तसेच जखमी इसम कृष्णा अर्जुन गुरव व अन्य एक जण मिळून २५ डिसेंबर रोजी रात्री शिकारीला गेले होते. यावेळी वेदांतच्या हातून बंदूक हाताळताना चुकून फायर झाली व ती गोळी व छरे चुलत भाऊ कृष्णा गुरव याचे पोटातून व मांडीतून गेले. त्याला वाडीतील लोकांच्या मदतीने प्रथम उपजिल्हा रुग्णालय व तेथून अधिक उपचारासाठी गोवा बांबूळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : बदलापुरमध्ये पुन्हा लैंगिक अत्याचार; मैत्रिणीने मद्य पाजल्यानंतर पीडितेशी रिक्षाचालकाचे अश्लाघ्य कृत्य, पोलिसांनी केली अटक

या दुर्दैवी घटनेनंतर गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या कानावर माहिती पडताच त्यांनी पोलिस पाटील मार्फत चौकशी केली तसेच गोवा बाबुंळी रूग्णालयात चौकशी करण्यासाठीही पुढाकार घेतला. यानंतर शिकारीला गेलेल्यांची माहिती मिळाली आहे. भल्या पहाटे पोलिसांनी कारवाई करण्याची हालचाली सुरू केल्या आहेत.

Story img Loader