सावंतवाडी : शिवसेना (शिंदे गट) चे नेते माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. त्यांचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी ब्रिगेडीअर सावंत म्हणाले,मी दहशतवादाला साथ देणाऱ्या विरोधात कायमच उभा राहीलो आहे. उध्दव ठाकरे यांनी सर्वांना बरोबर घेऊन नवीन महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी दिशा दिली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते विनायक राऊत, माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार परशुराम उपरकर,शिवसेना उपनेते शरद कोळी, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी,माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत,काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, माजी सभापती जयप्रकाश चमणकर,रेवती राणे, डॉ जयेंद्र परुळेकर, विभावरी सुकी आदी उपस्थित होते.

Manisha kayande
मुख्यमंत्री शिंदेच पुन्हा ‘किंग’?… शिवसेना प्रवक्त्यांनी जे सांगितले त्यावरून…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Kalyan East Shiv Sena appoints Nilesh Shinde as city chief
कल्याण पूर्व शिवसेना शहरप्रमुखपदी नीलेश शिंदे यांची नियुक्ती
seven people dismissed from Shiv Sena Shinde party
शिवसेना (शिंदे) पक्षातील सात जणांची हकालपट्टी
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला
maharashtra assembly election 2024 chief minister eknath shinde criticizes on manifesto of maha vikas aghadi
”महाविकास आघाडीचा जाहीरनामा ही पंचसूत्री नसून थापासुत्री”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका!
Kalyan, Dombivli rebels, Kalyan, Dombivli, campaigning,
कल्याण, डोंबिवलीतील बंडखोरांचे पाठीराखे प्रचारातून गायब; बंडखोर, अपक्षांचा एकला चलो रे मार्गाने प्रचार
Saravankar campaign in front of Shiv Sena Bhavan Participation of MP Shrikant Shinde
शिवसेना भवनासमोरून सरवणकर यांची प्रचारफेरी; खासदार श्रीकांत शिंदे यांचा सहभाग

हेही वाचा : Ajit Pawar : अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, बॅगांसह जेवणाचा डबाही तपासला, VIDEO शेअर करत म्हणाले…

ब्रिगेडियर सावंत म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला नवीन महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी दिशा दिली आहे. पक्ष मोठा होईल. दहशत गुंडागर्दी नारायण राणे यांनी माजवली तेव्हापासून माझा त्यांना विरोध आहे त्यांच्या सोबत असणाऱ्यांच्या विरोधात मी कायमच राहिलो आहे. कोकणात नवीन शक्ती निर्माण करून उद्धव ठाकरे यांनी दिशा देण्याचे काम केले आहे. फसविणाऱ्या गद्दारांना धडा शिकवणे ही आजची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवण राजकोट येथील पुतळा उभारू नये म्हणून मी नौसेनेला सांगितले होते. ती जमीन मच्छीमारांची आहे तरी तो पुतळा बांधला आणि कोसळला याची या लोकांना लाज वाटत नाही. उद्धव ठाकरे यांनी कायमच लोकांना सन्मान दिला आहे ते सन्मानपूर्वक नवीन पुतळा उभारतील असा मला विश्वास वाटतो.

हेही वाचा : Parambir Sing : “उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या सांगण्यावरुन लक्ष्मीकांत पाटील..”, परमबीर सिंग जस्टिस चांदिवाल यांच्या दाव्यावर काय म्हणाले?

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,शिवसेना उपनेते शरद कोळी, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी आमदार परशुराम उपरकर,डॉ जयेंद्र परुळेकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ जान्हवी सावंत, आडाळी सरपंच पराग गावकर , काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख आदींनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांना विजयी करण्याचे आवाहन केले.