सावंतवाडी नगरपालिका राज्यात अग्रेसर राहावी म्हणून मॉडेल सीटीसारखा विकास  सुरू आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी दिली. या वेळी उपनगराध्यक्ष राजन पोकळे उपस्थित होते.
सावंतवाडी शहराचा विकास मॉडेल सीटीसारखाच केला जात आहे. ‘क’ नगरपालिका क्षेत्र असले तरी पर्यटनाचे विविध प्रकल्प राबवून ही नगरपालिका राज्यात पोहोचली आहे, असे नगराध्यक्ष बबन साळगांवकर म्हणाले. या वेळी अभियंता तानाजी पालव, भाऊ भिसे, कुडपकर आदी उपस्थित होते.
सावंतवाडी नगरपालिका क्षेत्रात पाणीटंचाई नाही. पाळणेकोंड धरणावर गोडबोले गेट उभारण्यास मान्यता मिळाल्याने पाणीसाठा वाढणार आहे.
तसेच नरेंद्र डोंगरावर नैसर्गिक पाण्याच्या स्रोतावर आधारित वैशिष्टय़पूर्ण योजनेतून १८ लाखांची योजना साकारत आहे. झऱ्याचे पाणी साठवून उन्हाळ्यात चार लाख, तर पावसाळ्यात पाच लाख लिटर पाणीपुरवठा करण्याची योजना साकारत आहे. त्याशिवाय आणखी चार लाख लिटरची पाण्याची साठवणूक करणारी टाकी उभारत आहोत, तसेच पाण्याचे लीकेज, पाणी साठवणूक आदी माहिती उपलब्ध करून देणारी यंत्रणा बसवीत आहोत, असे साळगांवकर म्हणाले.
सावंतवाडी शहराचा सर्वागीण विकास करण्यासाठी पुढील ५० वर्षांची वाटचाल लक्षात घेऊन आराखडा बनविला जात आहे. सावंतवाडी शहरात राबविण्यात आलेले सर्व पर्यटन प्रकल्प कार्यान्वित होतील, असे सांगून शहरात चार ठिकाणी बालोद्याने उभारली जातील. त्यातील सुवर्ण कॉलनी बालोद्यानाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे, असे साळगांवकर म्हणाले. शिल्पग्राम प्रकल्पस्थळी बारा बलुतेदारांची शिल्पकृती बसविण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा