कराड : पुणे-बंगळुरु महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामामध्ये आजवर सात हजारांहून अधिक मोठी म्हणजेच पर्यावरणासाठी अतिशय मोलाची असणारी झाडे  तोडण्यात आली आहेत. परंतु, या वृक्षांचे पुनर्रोपण करणे गरजेचे असे आवाहन करताना, यातील काही वृक्षांचे आपण वहागाव (ता. कराड) येथे पुनर्रोपण करीत असल्याचे पर्यावरण आणि वृक्षप्रेमी कार्यकर्ते, सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सयाजी शिंदे यांनी  महामार्गावरून प्रवास  करताना मंगळवारी ( दि. १४)  महामार्गावरील  विस्तारीकरणामध्ये तोडण्यात आलेल्या झाडांची पाहणी केली. आणि यातील दोन मोठी झाडे क्रेनच्या साह्याने उचलून आणून वहागाव येथे त्यांचे पुनर्रोपण केले. दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांचे सहकारी व महामार्ग कामावरील कर्मचारी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, की सध्या महामार्गालगत असलेले वटवृक्ष हे जवळपास दोनशे वर्षांपूर्वीचे आहेत. महामार्ग विस्तारीकरणामध्ये या झाडांवर कुऱ्हाड पडत आहे. त्या बदल्यात झाडे लावण्याचा प्रयत्नही होईल. परंतु, अशा वृक्षांचे संगोपन करण्यामध्ये सातत्य राहत नाही. त्यामुळे महामार्ग विस्तारीकरणात निघणाऱ्या बहुतांशी झाडांचे पुनर्रोपण करणे गरजेचे आहे. एका वडाच्या झाडावर जवळपास पाचशे प्रकारच्या प्रजाती जगत असतात. तसेच मधमाशांचे मोहोळही याच झाडांवर जास्त प्रमाणात दिसून येते. हीच झाडे तोडल्यावर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या जीवांचे काय? असा प्रश्न उपस्थित करत यातील बहुतांशी झाडे वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असेही आवाहन शिंदे यांनी केले.

दरम्यान, महामार्गावरील वृक्षतोडीची पाहणी करताना एका झाडावर असलेल्या मधमाशांच्या मोहोळाने उपस्थितांवर हल्ला केला. यामध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांनाही काही मधमाशांनी डंक मारला. परंतु, मधमाशांच्या हल्ल्यात मानेवर किरकोळ सूज आली असून आपण अगदी सुखरूप असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.