Maharashtra Rain News Updates, 11 July 2022 : राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना खासदारांची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेतील बंडखोरी, राष्ट्रपतीपदाची निवडणूक अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तर दुसरीकडे शिवसेना आणि शिंदे गटाने एकमेकांविरोधात केलेल्या याचिकांवरही आज सुनावणी होती. मात्र सरन्यायाधीश रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाची कार्यसूची रविवारी जाहीर करण्यात आली. त्यात या याचिकांचा सुनावणीसाठी समावेश नाही. त्यामुळे आजच्या सुनावणीचे नेमके काय होणार, याबाबत संदिग्धता आहे.

तर दुसरीकडे राज्यात सध्या सर्वदूर जोरदार पाऊस सुरु आहे. कोणण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबई आणि उपनगरांतही पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. या पावसामुळे मुंबईच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर अनेक ठिकाणी नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. या सर्व घडामोडींचे लेटेस्ट अपडेट्स एका क्लिकवर.

Live Updates

Maharashtra Latest News Today: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…

21:59 (IST) 11 Jul 2022
“मी इतक्या लवकर जात नाही”, कॅन्सरचं निदान झाल्यावर शरद पवारांनी लावली होती डॉक्टरांसोबत पैज, सांगितला किस्सा!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना २००४ साली कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांच्याकडे केवळ सहा महिने उरले असल्याचं सांगितलं होतं. पण संबंधित डॉक्टरांचा अंदाज पवारांनी खोटा ठरवून दाखवला आहे. आज २०२२ साल सुरू असताना ते आठवड्यातील चार दिवस राज्याच्या दौऱ्यावर असतात. २००४ साली कॅन्सरचं निदान झाल्यानंतर त्यांचा डॉक्टरांशी जो संवाद झाला होता, याबाबतचा एक किस्सा शरद पवार यांनी सांगितला आहे. सविस्तर बातमी

21:08 (IST) 11 Jul 2022
पिंपरी पालिकेच्या परिचारिका भरतीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

पिंपरी पालिकेतील वैद्यकीय विभागात मानधनावर १५ वर्षांपासून काम करणाऱ्या आणि करोनाच्या संकट काळातही स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करणाऱ्या परिचारिकांना महापालिका सेवेत कायम करण्याऐवजी पालिकेने सुरू केलेल्या नव्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सविस्तर वाचा बातमी…

20:59 (IST) 11 Jul 2022
“भाजपा बंडखोर आमदारांना वापरून सोडणार”, कायदेशीर बाबींचा उलगडा करत अतुल लोंढेंचा दावा

शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात सत्तापालट झाला आहे. पण बंडखोर आमदार अद्याप कोणत्याही पक्षात सामील झाले नाहीत, ते अजूनही शिवसेनेत असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे मूळ शिवसेना कुणाची? हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. न्यायालयात दाखल केलेल्या विविध याचिकांवर आज सुनावणी होणार होती. पण हे प्रकरण घटनापीठाकडे द्यावं लागेल, अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अंतर्गत कलहात आता पुढे काय निर्णय होणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. सविस्तर बातमी

20:27 (IST) 11 Jul 2022
बुडणाऱ्याला वाचवणे जीवावर बेतले ; डोंबिवलीतील दोघांचा नदीत बुडून मृत्यू

नदीत बुडणाऱ्या अनोळखी व्यक्तीला वाचवण्यासाठी दोन तरुणांनी नदीत उडी घेतली. यात तो व्यक्ती वाचला सुद्धा. मात्र वाढता पाण्याचा प्रवाह आणि पाण्याचा अंदाज न आल्याने वाचवणाऱ्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा बातमी…

20:00 (IST) 11 Jul 2022
डिस्कव्हरी सोल्यूशन्सतर्फे वीस सेकंदात करोना संसर्गाचे निदान शक्य ; मायलॅब डिस्कव्हरी चाचणी संचाची निर्मिती

करोना विषाणू संसर्गाचे निदान आता अवघ्या वीस सेकंदात करणे शक्य होणार आहे. पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स आणि पोर्टलँड स्थित हेमेक्स हेल्दकेअर यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ‘गॅझेल – पॅथोकॅच’ असे या चाचणी संचाचे नाव आहे. सविस्तर वाचा बातमी…

19:43 (IST) 11 Jul 2022
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्म यांना पाठिंबा द्या; शिवसेना खासदारांची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेना खासदारांची बैठक आयोजित केली होती. राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित १६ खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्म यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

सविस्तर बातमी

19:39 (IST) 11 Jul 2022
लोणावळ्याच्या भुशी धरणात पर्यटक बुडाला; शोधकार्य सुरू ; जीव धोक्यात घालून पर्यटन करू नका- लोणावळा पोलीस

लोणवळ्यातील भुशी धरणात पर्यटक तरुण बुडल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी घडली असून लोणावळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. साहिल सरोज अस बुडालेल्या तरुणाच नाव आहे. विकेंड आणि येरव्ही लोणावळ्यात वर्षाविहारसाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. सविस्तर वाचा बातमी…

19:30 (IST) 11 Jul 2022
“राष्ट्रपती निवडणुकीबाबतचे सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना”, खासदारांची खदखद सुरू असताना राऊतांचं मोठं विधान

येत्या काही दिवसात देशात राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या भाजपाकडून द्रौपदी मूर्मू राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर विरोधीपक्षाकडून यशवंत सिन्हा हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा द्यावा, अशी मागणी काही शिवसेना खासदारांनी केली आहे. राष्ट्रपती निवडणुकीवरून काही खासदारांची खदखद सुरू असताना शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. सविस्तर बातमी

19:29 (IST) 11 Jul 2022
विश्लेषण : गरज आहे आणखी एका विमानवाहू युद्धनौकेची…

भारतीय नौदल आणखी सक्षम होण्याच्या दृष्टीने आता एक पाऊल पुढे पडत आहे. कोच्ची शिपयार्ड तर्फे लवकरच ‘आयएनएस विक्रांत'(INS Vikrant) ही स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका (aircraft carrier) ही नौदलाकडे सुपूर्त केली जाणार आहे. त्यानंतर येत्या १५ ऑगस्टला नौदलाच्या सेवेत आयएनएस विक्रांत दाखल होणार आहे. याआधीच आयएनएस विक्रमादित्य विमानवाहू युद्धनौका नौदलात कार्यरत आहे. पण गरज आहे तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेची….

सविस्तर वाचा

19:19 (IST) 11 Jul 2022
गडचिरोलीतील अतिवृष्टी आणि पुरग्रस्त भागाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहाणी

गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष पूर परिस्थितीची पाहणी केली. जिल्हाधिकारी संजय मीना व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पाणी पातळी व उपाय योजने संदर्भात माहिती दिली.

19:08 (IST) 11 Jul 2022
वातानुकूलित लोकलमधील फुकट्या प्रवाशांवर बडगा ; पश्चिम रेल्वेकडून सहा महिन्यात ११ हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पश्चिम रेल्वेने कठोर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या सहा महिन्यांत ११ हजार २१६ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढतच असल्याचे कारवाईतूनही समोर आले आहे.सविस्तर वाचा बातमी…

18:47 (IST) 11 Jul 2022
सांगली : मिरजेतील मटण मार्केटमध्ये दोन गटात जोरदार धुमश्‍चक्री

मालकी हक्क व विस्तारित गाळ्यात वाट्याला काय येणार? यातून दोन गटात आज (सोमवार) दुपारी मिरजेतील मटण मार्केटमध्ये जोरदार धुमश्‍चक्री माजली. आमदार सुरेश खाडे यांनी नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ करून आमदारांची पाठ फिरताच दोन गटात दगड, विटा, हत्यारे, काठ्यांनी मारामारी झाली. अखेर पोलिसांनी सौम्य छडीमार करून वाद आटोक्यात आणला. वाचा सविस्तर बातमी…

18:34 (IST) 11 Jul 2022
Covid 19 : मुंबईत बाधितांचे प्रमाण चार टक्क्यांवर; दैनंदिन रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात घट

मुंबईत करोनाच्या प्रादुर्भावामध्ये झपाट्याने घट होत असून बाधितांचे प्रमाण चार टक्क्यापर्यंत कमी झाले आहे, तर दैनंदिन करोनाबाधितांचा आलेखही ५०० च्या खाली गेला आहे. मुंबईतील चौथी लाट तिसऱ्या लाटेप्रमाणेच जलद गतीने वाढली, त्याच रीतीने ओसरायलाही सुरुवात झाली आहे. जुलैच्या पहिल्या दहा दिवसांतच बाधितांचे प्रमाण सुमारे १० टक्क्यांवरून आता चार टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. वाचा सविस्तर बातमी…

18:16 (IST) 11 Jul 2022
घरकाम करणाऱ्या महिलेकडून तीन लाखांचे दागिने लंपास ; मार्केट यार्ड भागातील घटना

घरकाम करणाऱ्या महिलेने तीन लाख रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना मार्केट यार्ड भागात घडली. या प्रकरणी घरकाम काम करणाऱ्या महिलेच्या विरोधात मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाचा सविस्तर बातमी…

18:06 (IST) 11 Jul 2022
पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह टीका प्रकरण : राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्यापासून दिलेला दिलासा कायम

राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल तक्रारीची सुनावणी २८ जुलैपर्यंत न घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने आज (सोमवार) गिरगाव महानगरदंडाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे गिरगाव न्यायालयात हजर राहावे लागण्यापासून राहुल यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर बातमी…

17:54 (IST) 11 Jul 2022
विश्लेषण: अजून आठ वर्षांनी अबू सालेम तुरुंगातून सुटणार? २००५ मध्ये भारत-पोर्तुगालमध्ये नेमका काय करार झाला?

मुंबईमध्ये १९९३ साली साखळी बॉम्बस्फोट घडवणाऱ्या प्रमुख दोषींपैकी एक असणाऱ्या आबू सालेमला तुरुंगामधून सोडलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज म्हणजेच ११ जुलै २०२२ रोजी केंद्र सरकारला पोर्तुगाल सरकारशी झालेल्या कराराची आठवण करुन दिली. केंद्र सरकारने पोर्तुगाल सरकारला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आबू सालेमला काही वर्षांमध्ये सोडून दिलं जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने प्रत्यार्पण करारादरम्यान पोर्तुगालला दिलेल्या शब्दांचा सन्मान राखण्यासाठी सालेमला तुरुंगवासातून मुक्त करावं लागेल, असं न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितलं आहे. पण भारत आणि पोर्तुगालमध्ये नेमका कोणता करार झालेला?, त्यात भारताने काय शब्द दिलेला जाणून घ्या सविस्तर येथे क्लिक करुन.

17:39 (IST) 11 Jul 2022
मोबाईल हिसकावल्याने संतापून मुलाने मुंबई गाठली ; दोन दिवसानंतर लागला शोध

शाळकरी मुलांना मोबाईलचे व्यसन लागल्यामुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे. पालकांनी मुलांना मोबाईल वापरण्यास मनाई  केली तर संतापतात. अशीच एक घटना नागपुरात उघडकीस आली असून पालकांनी मुलाच्या हातून मोबाईल हिसकावल्याने संतापलेल्या मुलाने घरातून पलायन करीत थेट मुंबई गाठली. पोलिसांनी दोन दिवस परिश्रम घेत मुलाचा शोध घेतला. त्याचे समुपदेशन करून त्याला पालकांच्या स्वाधीन केले. ही घटना वाठोड्यात घडली. निशांत सुरेश सहारे असे मुलाचे नाव आहे. सविस्तर वाचा

17:38 (IST) 11 Jul 2022
नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची भाजपाची निवडणूक आयोगाकडे मागणी

राज्यामध्ये सध्या ठिकठिकाणी अतिवृष्टी होत असून नदी – नाल्यांना पूर आल्यामुळे स्थानिकांचा संपर्क तुटला आहे. अशा स्थितीत राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषदा, ४ नगर पंचायती व १५ ग्रामपंचायतींमधील निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने मुंबईत राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांना याबाबत पत्र दिले आहे.

17:38 (IST) 11 Jul 2022
विदर्भात पावसाचा जोर कायम; नागपूरच्या हिंगणा तालुक्यात माय-लेकी वाहून गेल्या

उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात गेल्या आठवड्यापासून मोसमी पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात भीमनगर इसासनीमधील नाल्याच्या पुरात महिला आणि त्यांची १७ वर्षांची मुलगी पुरात वाहून गेली. महिलेचा मृतदेह सापडला असून मुलीचा शोध सुरू आहे. सुकवण म्हात्रे असे मृत आईचे, तर अंजली म्हात्रे असे मुलीचे नाव आहे. वाचा सविस्तर बातमी…

17:24 (IST) 11 Jul 2022
पूर परिस्थिती पाहणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचिरोलीला रवाना

गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर दाखल झाले आहेत. मात्र, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर ऐवजी ते रस्ते मार्गाने गडचिरोलीकडे रवाना झाले आहेत.

17:19 (IST) 11 Jul 2022
बहुप्रतिक्षित मुरबाड रेल्वेला गती मिळणार; प्रकल्पाच्या ५० टक्के खर्चाची राज्य सरकारकडून हमी

बहुप्रतिक्षित टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गाच्या खर्चात राज्य सरकारकडून ५० टक्के खर्च उचलण्यात येणार आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विनंतीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाकडे ५० टक्के खर्चाच्या हमीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश आज (सोमवार) दिले. त्यामुळे या टिटवाळा मुरबाड रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. वाचा सविस्तर बातमी…

17:18 (IST) 11 Jul 2022
Aarey Protest: “आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा”, राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची मुंबई पोलिसांना नोटीस

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर, कांजूरमार्ग येथे होणारं मेट्रो कारशेड पुन्हा आरेत उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे पर्यावरण प्रेमी मंडळींनी 'आरे वाचवा' आंदोलन तीव्र केलं आहे. दर रविवारी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. अलीकडेच झालेल्या आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी नव्या सरकारवर टीका केली होती. सविस्तर बातमी

16:57 (IST) 11 Jul 2022
ठाणे : कोपरी प्रभाग समितीच्या इमारतीचा बाहेरील सज्जा पडला

ठाणे येथील कोपरी भागातील महापालिकेच्या प्रभाग समिती इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा बाहेरील सज्जा आज (सोमवार) दुपारी पडला. या घटनेत कुणीही जखमी झालेले नसले तरी दोन दुचाकींचे नुकसान झाले. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने इमारतीमधील कार्यालय तत्काळ बंद केले असून, ते इतरत्र हलविण्यासाठी पावलं उचलली आहेत. वाचा सविस्तर बातमी…

16:39 (IST) 11 Jul 2022
धनुष्यबाण वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे धाव

तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्हदेखील जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. असे असताना शिवसेनेने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय धनुष्यबाण या चिन्हाविषयी कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती शिवसेनेने केली केली आहे. वाचा सविस्तर

16:38 (IST) 11 Jul 2022
प्राण गेले तरी बेहत्तर.., पण अमरावती भाजपाची प्रयोगशाळा होऊ देणार नाही – यशोमती ठाकूर

“भाजपा हा राष्ट्रवादाच्या नावाखाली देशात जातीय तेढ निर्माण करून, मतांच्या धृवीकरणाचा खेळ चालवत आहे. आमचे प्राण गेले तरी चालेल पण, अमरावती भाजपची प्रयोगशाळा होऊ देणार नाही. देशामध्ये ज्या हिंसक घटना घडत आहेत, त्या घटनांमागे भाजपचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असून अमरावती आणि उदयपूरच्या घटनांमध्येही ते दिसून आले आहे.” असा आरोप काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत केला. वाचा सविस्तर बातमी…

16:15 (IST) 11 Jul 2022
ठाण्यातील शिवसेना शाखांवर शिंदे गटाचा डोळा?

ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे मुख्य केंद्र असलेले टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ताबा मिळविला असतानाच, त्यापाठोपाठ आता शहरातील शिवसेनेच्या शाखाही ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाने प्रयत्न सुरु केले आहेत. शिंदे गटाचे कार्यकर्ते शाखांमध्ये जाऊन त्यांना शिंदे गटात सामील होण्यास सांगत असून त्यास काही जणांकडून नकार दिला जात असल्याने दोन्ही गटात वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शाखा कुणाच्या असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. वाचा सविस्तर बातमी…

15:54 (IST) 11 Jul 2022
घरावरुन काँग्रेसचे झेंडे काढा, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल

मध्यप्रदेशमधील रतलाम येथील भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार प्रल्हाद पटेल यांचा अचंबित करणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ज्यांच्या घरांवर काँग्रेस पक्षाचा झेंडा आहे, तो काढून टाकण्याचे पटेल सांगत आहेत. तसेच ज्यांच्या घरावर काँग्रेसचा झेंडा आहे, त्यांच्या सर्व सुविधा बंद करा, असे ते आपल्या सहकाऱ्यांना सांगताना दिसत आहे. पटेल यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. वाचा सविस्तर

15:45 (IST) 11 Jul 2022
“‘मी’पणा विसरुन ‘आम्ही’ अशी व्यापक…”; राहुल गांधींनी मराठीतून लिहिलेली आषाढीची पोस्ट अनेकांनी नितेश राणेंना पाठवली, कारण…

आषाढी एकादशीनिमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र राहुल यांनी मराठीत केलेली ही पोस्ट अनेकजण भाजपाचे आमदार नितेश राणेंनी पाठवतानाचं चित्र सोशल मीडियावर दिसत आहे. येथे क्लिक करुन जाणून घ्या नेमकं यामागील कारण तरी काय…

15:07 (IST) 11 Jul 2022
एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यासाठी रवाना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचीरोली दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. अतिवृष्टी तसेच पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यसाठी ते गडचीरोली जिल्ह्याकडे रवाना झाले आहेत. तेथे जिल्हाधिकाऱ्यांसोबत ते आढवा बैठक घेतील.

14:55 (IST) 11 Jul 2022
…म्हणून तेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेंचं नाव निश्चित केलं; शरद पवारांचा खुलासा

महाराष्ट्रामध्ये मागील दोन आठवड्यांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींसंदर्भात भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचं नेतृत्व करण्याची आणि मुख्यमंत्री पदाची जबाबदारी उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर का देण्यात आली याबद्दलचा खुलासा केलाय. माहाविकास आघाडी सरकारमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी बंडखोरी केल्यानंतर २९ जून रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याच साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच शरद पवारांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यामागील कारण सांगितलं. येथे वाचा सविस्तर वृत्त…

महाराष्ट्र Live Update