Maharashtra Rain News Updates, 11 July 2022 : राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना खासदारांची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेतील बंडखोरी, राष्ट्रपतीपदाची निवडणूक अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तर दुसरीकडे शिवसेना आणि शिंदे गटाने एकमेकांविरोधात केलेल्या याचिकांवरही आज सुनावणी होती. मात्र सरन्यायाधीश रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाची कार्यसूची रविवारी जाहीर करण्यात आली. त्यात या याचिकांचा सुनावणीसाठी समावेश नाही. त्यामुळे आजच्या सुनावणीचे नेमके काय होणार, याबाबत संदिग्धता आहे.

तर दुसरीकडे राज्यात सध्या सर्वदूर जोरदार पाऊस सुरु आहे. कोणण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबई आणि उपनगरांतही पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. या पावसामुळे मुंबईच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर अनेक ठिकाणी नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. या सर्व घडामोडींचे लेटेस्ट अपडेट्स एका क्लिकवर.

Live Updates

Maharashtra Latest News Today: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…

14:39 (IST) 11 Jul 2022
राष्ट्रवादीकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत २७ टक्के उमेदवार फत्त OBC समाजाचे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार हे ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. तशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. वाचा सविस्तर

14:28 (IST) 11 Jul 2022
पुणे : सदनिकेचा दरवाजा बनावट चावीने उघडून तीन लाखांचा ऐवज लांबविला

सदनिकेचा दरवाजा बनावट चावीने उघडून चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा तीन लाख चार हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना हडपसर भागात घडली. चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून चोरट्याचा शोध सुरू आहे. वाचा सविस्तर बातमी…

14:18 (IST) 11 Jul 2022
मनसेला मंत्रिपद दिले जात असेल तर आमचा त्याला विरोध – रामदास आठवले

“राज्य सरकारमध्ये मनसेला मंत्रिपद देण्याची हालचाल सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. यापुर्वीच्या निवडणुकांमध्ये मनसे हा भाजपा, रिपब्लिकन पक्षासोबत कधीच नव्हता. त्यामुळे मनसेला मंत्रिपद देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अशाही परिस्थितीत मनसेला मंत्रिपद देण्यात येत असेल तर आमचा त्याला विरोध असेल.”, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कल्याण स्पष्ट केली. वाचा सविस्तर बातमी…

13:58 (IST) 11 Jul 2022
ठाणे : कर्जाची रक्कम वसुल करण्यासाठी बदनामीकारक छायाचित्र तयार करून महिलेला धमकी

नातेवाईकाने ४० हजार रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर रक्कम आणि त्यावरील व्याज असे एक लाख रुपये भरले नाही, म्हणून ऑनलाईन कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडून एका महिलेच्या छायाचित्रात बदल करून ते छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित करणार असल्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी…

13:55 (IST) 11 Jul 2022
नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ

नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

13:36 (IST) 11 Jul 2022
गॅस, वीज दरवाढीच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

केंद्रातील मोदी सरकारने ५० रुपये गॅस दरवाढ आणि राज्यातील शिंदे सरकारने वीज दरवाढ तसेच जेवणावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आज(सोमवार) पुण्यातील बालगंधर्व चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी गरिबी, महागाई आणि बेरोजगारी नावाचे मुखवटे घालून तरूणी आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. वाचा सविस्तर बातमी…

13:33 (IST) 11 Jul 2022
अजित पवारांचं बंड मोडण्यात तुम्हाला यश आलेलं मग उद्धव ठाकरे बंड का मोडू शकले नाहीत?; शरद पवार म्हणाले, “आमच्यात काही…”

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या कालावधीत नोव्हेंबर २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकींनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेली बंडखोरी अनेकांना आठवली. याचवरुन शरद पवारांना, “अजित पवारांचं बंड मोडण्यात तुम्हाला यश आलेलं मग उद्धव ठाकरे बंड का मोडू शकले नाहीत?” असा प्रश्न विचारण्यात आला असता ते काय म्हणाले जाणून घ्या… येथे वाचा सविस्तर वृत्त…

13:26 (IST) 11 Jul 2022
शिवसेना विरुद्ध शिंदे : “आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा त्यांचा निष्ठेबाबातचा…”; उद्धव ठाकरेंकडून ‘त्या’ १५ आमदारांना पत्र

महाविकास आघाडीमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात पुकारलेलं बंड आणि त्यानंतर राज्यात झालेलं सत्तांतरणाच्या पार्श्वभूमीवर बंडखोर शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा वाद अगदी न्यायलयापासून विधानसभेपर्यंत सर्वच ठिकाणी सुरु आहे. आमदार अपात्रतेसंदर्भातील खटला ते आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दोन्ही बाजूने झाडल्या जात असतानाच ४० आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यानंतरही न्यायलयीन लाढाई आणि आरोप प्रत्यारोप सुरु असून याचदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या सत्तासंघर्षामध्ये त्यांच्या पाठिशी असणाऱ्या शिवसेनेच्या १५ आमदारांना एक विशेष पत्र पाठवलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त.

13:25 (IST) 11 Jul 2022
“…तेव्हा लाज वाटली नव्हती का?”; शिंदे गटाचा ठाकरेंना रोखठोक सवाल

२०१९ साली शिवसेना – भाजपाने एकत्र निवडणूक लढवल्या होत्या. राज्यातील जनतेने या युतीलाच कौल दिला होता. सेना-भाजपा एकत्र सत्ता स्थापन करावी अशीच लोकांची भावना होती. मात्र, त्यानंतरही आपण असंगाशी संग करत काँग्रेस राष्ट्रवादीशी धरोबा केला. लोकभावनेला पायदळी तुडवत असताना तेव्हा आपल्याला लाज वाटली नव्हती का?, असा सवाल शिंदे गटाकडून प्रतोद म्हणून नेमणूक केलेल्या भरत गोगावले यांनी विचारला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

13:17 (IST) 11 Jul 2022
शिंदे गटातील बंडखोर आमदार भरत गोगावले यांच्या कारला अपघात

शिंदे गटातील बंडखोर शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या कारचा अपघात झाला आहे. भरत गोगावले यांचा ताफा ईस्टर्न-एक्स्प्रेसवेवरुन निघालेला असताना आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या. रस्त्यात टॅक्सी बिघडल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती भरत गोगावले यांनी दिली आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही.

सविस्तर बातमी

13:08 (IST) 11 Jul 2022
सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना निर्णय न घेण्याचा आदेश देताच शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले असल्याने शिंदे गटातील १६ आमदारांना दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीशांकडे दाखल याचिकांवर सुनावणीसाठी विनंती केली असता हे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान सुप्रीम कोर्टाने घटनापीठीकडे प्रकरण सोपवावं लागेल सांगताना त्यासाठी अवधी लागणार असल्याचंही म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाकडून हे अपेक्षित नाही सांगत त्यांनी नाराजी जाहीर केली आहे.

सविस्तर बातमी

13:07 (IST) 11 Jul 2022
पुणे : ‘पीएमपी’ प्रवाशाची ६० हजारांची सोनसाखळी लंपास

‘पीएमपी’ प्रवाशाच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना नगर रस्त्यावर घडली. याबाबत सचिन गुरव (वय-४५, रा. सोमनाथनगर, वडगाव शेरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:21 (IST) 11 Jul 2022
शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांवर तूर्त कारवाई नको- सर्वोच्च न्यायालय

शिवसेनेतून बंड केलेल्या १६ आमदारांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशिवाय आमदारांवर कोणताही कारवाई करु नये, अशी सूचना सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे. सरन्यायाधीशांच्या या निर्णयामुळे शिंदे गटातील बंडखोर आमदारांना एका प्रकारे दिलासाच मिळाला आहे. वाचा सविस्तर

12:20 (IST) 11 Jul 2022
शिवसेनेने केसेस मागे घ्याव्यात, जनादेशाचा आदर करावा- बावनकुळे

शिवसेनेची परिस्थिती केवीलवाणी झाली. ज्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावात १६४ मतं मिळाली, तेव्हा शिवसेने सर्व केसेस मागे घ्यायला हव्या होत्या. सरकारला बहुमत मिळालं आहे. कोर्टाची सूचना म्हणजे सरकारला हा दिलासा आहे. माझी शिवसेनेला विनंती आहे, की केसेस मागे घ्याव्यात आणि जनादेशाचा आदर करावा, असे बावनकुळे म्हणाले.

12:09 (IST) 11 Jul 2022
वसई-पनवेल चौपदरीकरण, हार्बर जलद उन्नत प्रकल्प तूर्तास नाहीच

मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे (एमआरव्हीसी) पनवेल – वसईदरम्यानचे चौपदरीकरण, सीएसएमटी – पनवेल उन्नत जलद मार्गिका हे दोन्ही महत्त्वाचे प्रकल्प नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जातात. मात्र हे प्रकल्प व्यवहार्य नसल्यामुळे गेली १० वर्षे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळा शकलेली नाही. परिणामी, एमआरव्हीसीला हे प्रकल्प राबविणे अशक्य बनले असून पनवेल-वसई आणि हार्बरवरील सुखकर प्रवासाचे स्वप्न भंगले आहे. वाचा सविस्तर बातमी…

11:56 (IST) 11 Jul 2022
नागपूरमधील फडणवीसांच्या बॅनर्सवरुन अमित शाहांचे फोटो गायब; शरद पवारांना विचारलं असता म्हणाले, “त्याच्यात कोणाचा फोटो…”

महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंनी पुकारलेलं बंड आणि त्यानंतरच्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार सत्तेत आले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी मागील आठवड्यात नागपूर दौरा केला. मतदारांचे आभार मानण्यासाठी फडणवीसांनी नागपूर दौरा केल्याचं सांगितलं. या दौऱ्यादरम्यान प्राकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणी फडणवीसांचं अभिनंदन करणाऱ्या बॅनर्सवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे फोटो दिसत नव्हते. हा विषय राजकीय वर्तुळामध्ये चांगलाच चर्चेत आहे. असं असतानाच आता यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. येथे वाचा सविस्तर वृत्त…

11:55 (IST) 11 Jul 2022
२०० आमदार निवडून आणण्याच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, “मला वाटतं त्यांचं चुकलं काहीतरी, आपली…”

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर प्रथमच रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी राज्यातील सत्तांतरनाट्य, देशातील विरोधकांची भूमिका,  श्रीलंकेतील अराजक आणि न्यायप्रक्रियेबाबत कायदे अभ्यासकांकडून होत असलेली चिंता आदी मुद्द्यांवर त्यांनी मते व्यक्त केली. नव्या सरकारमधील प्रमुखांकडून येत्या विधानसभा निवडणुकीत २०० जागा निवडून आणू, आदी होत असलेल्या विधानावरही त्यांनी मिश्कीलपणे भाष्य केले. येथे वाचा सविस्तर वृत्त…

11:50 (IST) 11 Jul 2022
शीव – ठाणे उड्डाणपुलाचे २१ टक्के, तर मानखुर्द – ठाणे उड्डाणपुलाचे ७१ टक्के काम पूर्ण

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडा नगर येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी ‘छेडा नगर रस्ते सुधार प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून आतापर्यंत शीव – ठाणे उड्डाणपुलाचे २१ टक्के, तर मानखुर्द – ठाणे उड्डाणपुलाचे ७१ टक्के काम पूर्ण झाले आहे. आता निर्धारित वेळेत दोन्ही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले करण्याचा एमएमआरडीएचा मनस आहे. हे उड्डाणपूल सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवासाचा वेळ २० ते २५ मिनिटांनी कमी होईल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे. वाचा सविस्तर बातमी…

11:29 (IST) 11 Jul 2022
मुंबईत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू

मुंबईमध्ये आज (सोमवार) सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली असून दिवसभर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा केंद्राकडून वर्तविण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी…

11:09 (IST) 11 Jul 2022
बदलापूर : बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात १३ टक्क्यांनी वाढ

ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा होणाऱ्या बारवी धरणाच्या पाणी पातळीत गेल्या ११ दिवसात समाधानकारक वाढ झाली आहे. गेल्या ११ दिवसात धरणात तब्बल १३.६४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे बारवीचा पाणीसाठा थेट ४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. १ जुलै रोजी बारवी धरणात १०६ दशलक्ष घनमीटर इतके पाणी होते. तर ११ जुलै रोजी धरणात १५२ दशलक्ष घनमीटर इतके पाणी आहे. त्यामुळे पाऊस असाच पडल्यास याच महिन्यात धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची आशा आहे. वाचा सविस्तर बातमी…

11:04 (IST) 11 Jul 2022
“तुमचा मुलगा, मुलगी किंवा पुतण्याच तुमच्या पक्षातील पुढील ‘एकनाथ शिंदे’ ठरु शकतो”; मोदींवरील टीकेनंतर भाजपाचा इशारा

तेलंगण भाजपाने रविवारी मुख्यमंत्री के. चंद्शेखर राव यांना लक्ष्य केलं आहे. राव यांनी भाजपावर केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजपाने थेट महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा संदर्भ दिलाय. राव यांच्या तेलंगण राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएसमध्ये अनेक एकनाथ शिंदे आहेत, असं भाजपाने राव यांच्यावर टीका करताना म्हटलंय. राव यांच्या पक्षामधील अनेक नेते नेतृत्वावर नाराज असल्याचं सूचित करत भाजपाने मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय. येथे वाचा सविस्तर वृत्त

10:59 (IST) 11 Jul 2022
“सर्वोच्च न्यायालय आमच्या खिशात आहे अशी…”; शिंदे गटाविरुद्धच्या न्यायालयीन लढाईवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट यांच्यातील न्यायालयीन लढाईकडे सर्वाचे लक्ष लागले असताना, सर्वोच्च न्यायालयातील सोमवारच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश नसल्याने ही सुनावणी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. याबाबत बोलतना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण देश न्यायालयाकडे एका अपेक्षेने पाहत आहे असे संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

10:57 (IST) 11 Jul 2022
ठाणे : कळव्यात रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक तीन तास ठप्प; कारचे नुकसान

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मुसळधार पावसादरम्यान झाडे उन्मळून पडण्याचे सत्र सुरूच असून आज (सोमवार) पहाटे कळव्यातील रस्त्यावर मोठे झाड पडल्याने कळव्यातून मुंब्र्याकडे जाणारा मार्ग वाहतूकीसाठी तीन तास वाहतूक बंद होता. पहाटेच्या वेळेत वाहनांची वर्दळ कमी असली तरी मार्ग बंद झाल्याने काही प्रमाणात कोंडी झाली होती. या घटनेत कुणीही जखमी झालेले नसले तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाच्या आवारातील ७ ते ८ झाडे धोकादायक स्थितीत आहेत. वाचा सविस्तर बातमी…

10:34 (IST) 11 Jul 2022
नागपुरात ‘ट्रॉली बस’ आणि दोन नवे भुयारी मार्ग – नितीन गडकरींची घोषणा

नागपूरमध्ये मेट्रो धावायला अनेक वर्षे लागतील, असे नागपूरकर म्हणत होते. पण स्वप्नवत अशी सेवा चार वर्षात प्रत्यक्षात सुरू झाली. त्याला प्रतिसादही वाढता आहे. आता लवकरच कळमना ते हिंगणा दरम्यान ‘ट्रॉली’ बस सेवा सुरू करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे केली. याशिवाय दोन नव्या भुयारी मार्गाचीही त्यांनी घोषणा केली. तसेच ‘इंटर मॉडेल स्टेशन’ प्रकल्पात काही बदल करून त्याचे कामही सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाचा सविस्तर बातमी…

10:24 (IST) 11 Jul 2022
पुणे : विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी महापालिकेच्या शाळेतील शिक्षक गजाआड

पुणे महापालिकेच्या शाळेत शारीरिक शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी खडक पोलिसांकडून कंत्राटी पद्धतीवर नेमणूक केलेल्या शिक्षकाला अटक करण्यात आली. वाचा सविस्तर बातमी…

10:02 (IST) 11 Jul 2022
बारवे-दिंडेवाडीतील धरणप्रकल्पाचे उद्घाटन आमदार आबिटकरांच्या हस्ते होऊ देणार नाही – शिवसैनिकांची आक्रमक भूमिका

राधानगरी-भुदरगड तालुक्याचे आमदार प्रकाश आबिटकर हे बंडखोरांच्या गटात सामील झाल्याने त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी मोर्चा काढुन निषेध केला आहे. बारवे-दिंडेवाडी येथील धरणप्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होऊ देणार नाही, असे सांगत कोल्हापुरातील शिवसेनेने बंडखोरांविरोधात थेट सामना होणार असल्याचे रविवारी स्पष्ट केले. वाचा सविस्तर बातमी…

10:01 (IST) 11 Jul 2022
पुणे : धरणक्षेत्रांत संततधार सुरूच; पाणीसाठा ३० टक्क्यांवर

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात संततधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे पाणीसाठा ३० टक्क्यांवर पोहोचला आहे. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली. वाचा सविस्तर बातमी…

09:47 (IST) 11 Jul 2022
मनसेला मंत्रीपद मिळाल्यास विरोध करु- रामदास आठवले

शिंदे-भाजपा यांच्या संयुक्त सरकारमध्ये मनसेलाही मंत्रीपद मिळू शकते, असे म्हटले जात आहे. असे असताना आता भाजपाचा सहयोगी पक्ष आरपीआयचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मनसेला मंत्रीपद देण्यास आमचा विरोध आहे, असे आठवले म्हणाले आहेत. वाचा सविस्तर

09:46 (IST) 11 Jul 2022
संतोष बांगर, तानाजी सावंत यांच्यावर शिवसेनेची मोठी कारवाई

उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांना यापूर्वी अनेकवेळा परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या प्रयत्नांना यश न आल्यामुळे आता शिवसेनेने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची जिल्हा प्रमुखपदावरुन तर तानाजी सावंत यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

महाराष्ट्र Live Update