Maharashtra Budget Session Updates, 14 March 2023: महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून आजची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली आहे. आज शिंदे गटाकडून वकील नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. त्यांच्यानंतर महेश जेठमलानी यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर शिंदे गटाची बाजू मांडली. यानंतर शेवट वरील मनिंदर सिंग यांनी शिंदे गटाची बाजू मांडताना आधीच्या काही खटल्यांचा दाखला सर्वोच्च न्यायालयाला दिला. दरम्यान, यावेळी न्यायालयात घडलेल्या एका प्रसंगामुळे चांगलाच हशा पिकला!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाचं थेट प्रक्षेपण सुप्रीम कोर्ट व्यवस्थापनाकडून केलं जातं.

Live Updates

Marathi News Updates: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप आणि राज्यभरातील इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

11:44 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis : हरीश साळवेंचा युक्तिवाद संपला

सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांना त्यांच्याकडच्या प्रलंबित प्रकरणांवर विहीत वेळेत निर्णय घेण्याचे निर्देश देऊ शकतात – हरीश साळवे

11:42 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: राज्यपालांनी अजून काय करायला हवं होतं? – हरीश साळवे

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. राज्यपालांना स्वीकारावाच लागणार. दुसरी व्यक्ती आली आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे बहुमत आहे. त्यांनी सरकार स्थापन केलं. आता ते कायदेशीर पद्धतीने आलं की नाही यावर अजून निर्णय व्हायचा आहे. त्यामुळे राज्यपालांनी काहीही चुकीचं केलेलं नाही – हरीश साळवे

11:40 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing:

जोपर्यंत तुमची अपात्रता ठरत नाही तोपर्यंत तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे – हरीश साळवे

11:36 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis : हरीश साळवेंचा अध्यक्षांच्या अधिकारांवर युक्तिवाद

जर विधानसभा अध्यक्ष काही ठरवत नसतील, तर त्यात भीतीचा प्रश्नच येत नाही. ते वास्तव आहे – हरीश साळवे

11:29 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis : राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा बोलवता येणार नाही – हरीश साळवे

राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना हे न्यायालय पुन्हा बोलवू शकत नाही – हरीश साळवे

11:28 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: बहुमत चाचणीबाबत हरीश साळवेंचा युक्तिवाद

उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीसाठी पाचारण करून राज्यपालांनी काहीही चुकीचं केलेलं नाही – हरीश साळवे

11:26 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis : हरीश साळवेंनी दिला नबाम राबिया खटल्याचा दाखला

हरीश साळवेंनी दिला नबाम राबिया खटल्याचा दाखला

11:25 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis : हरीश साळवेंचा युक्तिवाद सुरू

नबाम रबिया प्रकरणाचा विचार केला जात असेल, तर तो योग्य पद्धतीने व्हायला हवा – हरीश साळवे

11:22 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis : बहुमताची मोजणी राजभवनात होऊ शकत नाही – साळवे

बहुमताची मोजणी राजभवनात होऊ शकत नाही. ती विधानसभेतच व्हायला हवी – हरीश साळवे

11:19 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Political Crisis : पक्षात अंतर्गत फूट पडली आहे – हरीश साळवे

पक्षात अंतर्गत फूट पडल्याचा दावा हरीश साळवेंनी सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.

11:18 (IST) 14 Mar 2023
कोल्हापुरात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात; ८० हजार कर्मचारी संपात उतरल्याने शासकीय कार्यालये ओस पडली

कोल्हापूर : सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात ८० हजार सरकारी, निमसरकारी, महापालिका, नगरपालिका, शिक्षक आदी कर्मचारी सहभागी झाले असल्याचा दावा करण्यात आला.

सविस्तर वाचा..

11:16 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात.. हरीश साळवेंच्या युक्तिवादाला सुरुवात..

11:15 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: ..तर न्यायालयाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर बंधनकारक असेल – बापट

विधानसभा अध्यक्षांकडेच हे प्रकरण पुन्हा जायला हवं असं मला वाटतं. १०व्या परिशिष्टाखाली संबंधित व्यक्ती अपात्र झाली किंवा नाही हे विधानसभा अध्यक्षांनीच ठरवायला हवं. पण पक्षांतरबंदी कायद्याचा अर्थ सर्वोच्च न्यायालय लावणार आहे. उदाहरणार्थ, १६ बाहेर पडलेले आमदार अपात्र ठरले असा निर्णय न्यायालयानं दिला, तर तो निर्णय अध्यक्षांवर लागू असेल – उल्हास बापट

11:13 (IST) 14 Mar 2023
नागपुरात अजनीत असह्य कोंडी! ऐन परीक्षाकाळात विद्यार्थ्यांना फटका; सर्वसामान्य नागरिकांच्याही नाकीनऊ

जी-२० शिखर परिषदेसाठी एकीकडे शहराचा चेहरामोहरा बदलवण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे रस्त्याच्या अपूर्ण कामांमुळे नागपूरकरांची गैरसोय होत आहे. वर्धा मार्गावरील अजनी चौकात सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे येथे दिवसभर असह्य वाहनकोंडी होत आहे.

सविस्तर वाचा

11:12 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: निवडणूक आयोगाचा निकाल सर्वोच्च न्यायालयावर बंधनकारक नाही

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निवडणूक आयोगावर बंधनकारक आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय कोणत्याही अर्थाने सर्वोच्च न्यायालयावर बंधनकारक नाही. आयोगाच्या पारदर्शीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. – उल्हास बापट

11:11 (IST) 14 Mar 2023
वर्धा: राज्य शिक्षण मंडळाच्या आवाहनास मुख्याध्यापक संघाचा तत्पर प्रतिसाद; परीक्षांवरील संपाचे मळभ ओसरले

संपामुळे दहावी व बारावीच्या परीक्षांवर प्रश्नचिन्ह उमटले होते. त्यावर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढाकार घेत विनंती केली. मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त मंडळाचे अध्यक्ष व शिक्षक परिवारात आदरणीय म्हटल्या जाणारे रावसाहेब आवारी यांना विनंतीपर पत्र देत मंडळाने परीक्षा संचालित करण्याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सविस्तर वाचा

11:11 (IST) 14 Mar 2023
चंद्रपूर: ताडोबात ‘माया’साठी ‘रुद्रा’ व ‘बलराम’ या दोन वाघांमध्ये लढाई!, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील राजा हा पट्टेदार वाघ आहे. वाघाचा या प्रकल्पात अक्षरशः दबदबा आहे. मात्र, ताडोबातील रुद्रा व बलराम या दोन वाघांमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे.

सविस्तर वाचा

11:08 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: १६ आमदार अपात्र ठरले, तर सरकार पडेल – उल्हास बापट

आधी एक तृतीयांश गेले तरी चालत होतं. पण वाजपेयींच्या काळात घटनादुरुस्ती करून ते बदलण्यात आलं. पण दोन तृतीयांश गेले, तर ते एकाच वेळी जायला हवेत. इथे पहिले १६ बाहेर पडले, तेव्हा ते दोन तृतीयांश नव्हते. याचा अर्थ ते अपात्र ठरले आहेत. जर ते अपात्र ठरले, तर ते मंत्री राहणार नाहीत. जर मुख्यमंत्रीच राहिले नाहीत, तर सरकार पडेल. कारण त्या १६ जणांमध्ये मुख्यमंत्रीही आहेत. या परिस्थितीत राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करतील. सहा महिन्यांच्या आत पुन्हा निवडणुका होतील – उल्हास बापट

11:07 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: आजपर्यंतच्या अतीमहत्त्वाच्या प्रकरणांमध्ये याचा समावेश – उल्हास बापट

सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाल्यापासून आत्तापर्यंत आलेल्या अतीमहत्त्वाच्या प्रकरणांमध्ये या प्रकरणाचा समावेश करावा लागेल. कारण या प्रकरणामुळे भारतीय लोकशाहीची दिशा ठरणार आहे. १९८५ साली लोक पक्षांतरं कराययची आणि सरकार अस्थिर व्हायची. त्यामुळे राजीव गांधींनी घटनादुरुस्ती करून पक्षांतर बंदी कायदा आणला – उल्हास बापट

11:06 (IST) 14 Mar 2023
पुणे : महिलेचा विनयभंग करणाऱ्या एकास तीन महिने कारावास

पुणे : महिलेचा विनयभंग करणाऱ्या एकास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एम. चौहान यांनी तीन महिने साधा कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सविस्तर वाचा…

11:05 (IST) 14 Mar 2023
मालाडच्या आप्पापाड्यातील आग सोमवारी रात्री विझविण्यात यश; तीन हजार झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी

मुंबई : मालाडच्या अप्पापाडा परिसरात सोमवारी संध्याकाळी लागलेली आग रात्री ११ वाजता पूर्ण विझली. या आगीत तब्बल तीन हजार झोपड्या जळून खाक झाल्या. या सर्व कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले आहेत.

सविस्तर वाचा…

11:05 (IST) 14 Mar 2023
Maharashtra Assembly Budget Session: आजच्या कामकाजाला सुरुवात

महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या कामकाजाला सुरुवात..

11:02 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी संपात सहभागी. महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन

पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी संपात सहभागी. महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन

11:02 (IST) 14 Mar 2023
Old Pension Scheme Strike: कोल्हापूर जिल्ह्यातील 80 हजार कर्मचारी संपात सहभागी झाल्याचा दावा; शासकीय कार्यालये ओस पडली

कोल्हापूर जिल्ह्यातील 80 हजार कर्मचारी संपात सहभागी झाल्याचा दावा; शासकीय कार्यालये ओस पडली

11:00 (IST) 14 Mar 2023
नितीन गडकरींकडून योगी आदित्यनाथांची तुलना थेट भगवान श्रीकृष्णाशी; म्हणाले, “काही दिवसांपूर्वीच माझ्या पत्नीने…”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना थेट भगवान श्रीकृष्णाशी केली आहे. योगी आदित्यनाथ हे श्रीकृष्णाप्रमाणे समाजकंटकांविरोधात कठोर पावले उचलत असल्याचं ते म्हणाले. उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं. सविस्तर वाचा

11:00 (IST) 14 Mar 2023
Supreme Court Hearing: ९० टक्के शक्यता अशी आहे की.. – असीम सरोदे

९० टक्के शक्यता अशी आहे की सर्वोच्च न्यायालय ही सगळी जबाबदारी पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवू शकेल. राहुल नार्वेकरांनाच त्यासंदर्भातला निर्णय द्यावा लागू शकतो. उद्या सुनावणी संपेल, त्यानंतर काही दिवस निर्णय राखून ठेवून नंतर निकाल दिला जाईल – असीम सरोदे

11:00 (IST) 14 Mar 2023
“मिंधे गट आधी बाप पळवायचे, आता मुलंही पळवतात”; भूषण देसाईंच्या शिंदे गटातील प्रवेशावरून संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले…

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. दरम्यान, यावरून विविध राजकीय चर्चा सुरू असताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे. मिंधे गट आधी बाप पळवायचे, आता मुलंही पळवायला लागले, असे ते म्हणाले. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा

10:59 (IST) 14 Mar 2023
वैभव नाईकांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी; शिंदे गटात प्रवेश करणार? मुख्यमंत्री म्हणाले, “ते रोज मला…”

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत यांनी त्यांना पदावरून हटवलं आहे. दरम्यान, या कारवाईनंतर आमदार नाईक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा

10:58 (IST) 14 Mar 2023
“शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे शांत का?”, संजय राऊतांचा सवाल; म्हणाले, “बदनामी ही फक्त…”

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात शाब्दिक युद्धही सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते दिल्ली पत्रकारांशी बोलत होते. सविस्तर वाचा

10:54 (IST) 14 Mar 2023

महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Marathi News: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप आणि राज्यभरातील इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!