हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यामध्ये ८ गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामांमध्ये २६ लाख रुपयांचा गैरव्यवहार करून फसवणूक केल्या प्रकरणी औंढा नागनाथ पंचायत समितीच्या तत्कालीन गटविकास अधिकार्यांरसह नऊ जणांवर औंढा पोलिस ठाण्यात बुधवारी सकाळी गुन्हा दाखल झाला आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील नऊ गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गॅबियन बंधार्यां ची कामे करण्यात आली. या कामांना तत्कालीन गटविकास अधिकारी जगदीश साहू यांनी प्रशासकीय मान्यता दिली तर शाखा अभियंता सय्यद सलीम यांनी तांत्रिक मान्यता दिली.या 8 गावांमध्ये बंधार्यांंची कामांसाठी बनावट मजुरांची खाते कडून २६ लाख रुपयांचा गैरव्यवहार केला. याबाबत गोजेगाव ग्रामपंचायतीने भांडाफोड केल्यानंतर या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने चौकशी एक समिती स्थापन केली.
या समितीच्या चौकशीमध्ये बनावट मजुरांच्या खात्यांवर २६ लाख रुपये मजुरीची रक्कम टाकून उचलून घेतली. त्यातून मजूर व शासनाची फसवणूकझाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून या प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय देैने यांनी दिले होते बुधवारी सकाळी. गटविकासअधिकारी सखाराम बेले यांनी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल दिली.
यावरून पोलिसांनी तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी जगदीश साहू, शाखा अभियंता शेख सलीम, सहाय्यक लेखाधिकारी एल. के. कुबडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गजानन कल्याणकर, तांत्रिकअधिकारी राहुल सूर्यवंशी, सुयोग जावळे, डाटा एंट्री ऑपरेटर देवराव कंठाळे, विनोद गायकवाड, विनोद घोडके यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान या प्रकरणात आरोपींच्या अटकेसाठी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतिष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांचे पथक स्थापन करण्यात आले. या पथकांकडून आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे पोलिस विभागातील सूत्रांनी सांगितले.