भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेना(ठाकरे गट) नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, शेलारांना उत्तर देताना दानवेंनी मुंबई महापालिकेवरून गंभीर आरोपही केल्याचे समोर आले आहे.

अंबादास दानवे म्हणाले, “मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर करा, मग पाहू जनता तुम्हाला निवडून देते की आम्हाला? ते तर करत नाहीत आणि मग या बाकीच्या गप्पा करतात. आता दरोडा टाकण्याचं काम नाही चालू तर काय चालू आहे? आता G20 च्या निमित्त मुंबई महापालिकेने काय काय खर्च केला, एक ध्वज २४ हजार रुपयांना खरेदी केला आहे. मी इतके दिवस बोललो नव्हतो, आता बोलतोय याची चौकशी झाली पाहिजे. ध्वज खरेदीतही मुंबई महापालिकेत घोटाळा झालेला आहे.” टीव्ही 9 शी ते बोलत होते.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

“शिवसेनाप्रमुख नसतानाही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने मोठं यश प्राप्त केलं आहे. आता या गद्दारीमुळे संख्या कमी झाली असेल, परंतु याच गद्दारीमुळे आमची संख्या आणखी वाढणार आहे, हेही मी सांगतो. आशिष शेलार तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा, तुमच्यात काय काय सुरू आहे ते तुम्ही तुमचं सांभाळा आम्हाला सांगू नका. असं माझं स्पष्ट त्यांना सांगणं आहे.”

हेही वाचा – “ज्यांना स्वत:च्या आयुष्यात, कुटुंबात, पक्षात आणि सरकारमध्ये सलग अपयश आलं त्यांनी…” उद्धव ठाकरेंना आशिष शेलारांकडून प्रत्युत्तर!

“मला असं वाटतं शिवसेना एक स्वतंत्र पक्ष आहे, समाजकारण करणारा पक्ष आहे. वेगवेगळे मित्र शिवसेना जोडते. कधी न होऊ शकणारी युती शिवसेनेने केलेली आहे म्हणून यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. येणाऱ्या काळात ही वंचित बहुनज आघाडी आणि शिवसेना मला वाटतं हे देशातही चित्र जाऊ शकेल. वंचित बहुजन आघाडी शिवसेनेबरोबर आल्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, यांचा थयथयाट त्यांच्यामुळे सुरू आहे.”

मुंबई दौऱ्यावर असताना बँकेत पैसा ठेवून विकास होत नाही, तो पैसा विकासासाठी वापरला पाहिजे, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला होता. यावरून मुंबई महापालिकेचे हजारो कोटींच्या ठेवी या लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांनी घेतलेल्या मेहनतीमुळे ठेवता आल्या आहेत, असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान मोदी यांना दिलं. दरम्यान, यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले आशिष शेलार? –

“उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली. मी शेठजी यासाठी म्हणतो, की त्यांनी धनडांगग्या शेठजींसाठी कामं केली. त्यांनी बिल्डर, ठेकेदार, डिस्को, पब, बार या सर्वांना त्यांनी सुट दिली. मनपाच्या ठेवींबाबत बोलताना तेच म्हणाले की हे ठेकेदारांचे पैसे आहेत. आजही ठेकेदारांचे पैसे परत देण्यासाठी शेठजी उद्धव ठाकरे लक्ष देत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाने टाकलेल्या दरोड्यांपासून मुंबई महापालिका वाचवणं महत्त्वाचं आहे. यासाठी भाजपा मुंबईकरांबरोबर आहे”, असं शेलार म्हणाले आहेत.