सांगली : भूतबाधा काढण्यासाठी मांत्रिकाने केलेल्या मारहाणीत शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथे घडली. याप्रकरणी अंनिसच्या पाठपुराव्यानंतर मंगळवारी रात्री मांत्रिकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्यन दिपक लांडगे (वय १४) याला ताप येत होता. तो लवकर बरा होत नव्हता. म्हणून एका नातेवाईक महिलेने आर्यनला कर्नाटकातील कुडची जवळील शिरगूर या गावातील आप्पासाहेब कांबळे या मांत्रिकाकडे उपचारासाठी नेले होते. त्या मांत्रिकाने सांगितले की, मुलाला बाहेरची बाधा झाली आहे, त्यांच्या अंगात भूत शिरलं आहे, ते बाहेर निघत नाही. म्हणून त्या मुलाची भूतबाधा बाहेर काढण्यासाठी मांत्रिकाने त्या मुलाला अमानुषपणे मारहाण केली. यात त्याला गंभीर इजा झाल्याने त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरू असतानाच त्या मुलाचा शनिवारी मृत्यू झाला.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Accident
Accident News : सुरक्षेसाठी बसवलेली एअरबॅग ठरली जिवघेणी! वाशी येथे अपघातात ६ वर्षीय मुलाचा मृत्यू
Vinod Kambli Message to Sachin Tendulkar
Vinod Kambli : विनोद कांबळीचं वक्तव्य, “मी मरणार नाही, सचिनला निरोप द्या, मी लवकरच…”
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “मी मुख्यमंत्र्यांची विरोधक आहेच पण…”, बीड आणि परभणी प्रकरणी सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आवाहन
Pune Accident
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
Schoolboy commits suicide after not getting mobile phone sangli
सांगली: मोबाईल न मिळाल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या
Murder of youth Govandi , Argument after hit by car,
मुंबई : गाडीचा धक्का लागला म्हणून खून…

हेही वाचा – “अन्यायाविरोधात आवाज उठवणार नाहीत अशा लोकांना…”, राष्ट्रपती निवडीवरून संजय राऊतांचा केंद्रावर गंभीर आरोप

या घटनेचे गांभीर्य ओळखून कवठेमहांकाळ अंनिसचे कार्यकर्ते फारुक गवंडी, सचिन करगणे, दिगंबर कांबळे, भगवान सोनंद यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावातील त्या कुटुंबातील नातेवाईकांची भेट घेतली. त्यांना आधार देऊन मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यास तयार केले. मांत्रिकाच्या अमानुष मारहाणीमुळे आर्यनचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, त्यामुळे या मांत्रिकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्याकडे केली. त्यांनी तात्काळ मुलाच्या आईला पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन तिची फिर्याद दाखल करून घेऊन मांत्रिक आप्पासाहेब कांबळे याच्यावर भारतीय दंड विधान ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader