स्कूलबसच्या नावाखाली विनापरवाना विद्यार्थ्यांची मोठय़ा प्रमाणात वाहतूक केली जात आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने अशा वाहनांची कडक तपासणी करून कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
१६ ते ३० जून या कालावधीत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. मागील वर्षी स्कूलबसच्या नावाखाली विनापरवाना वाहनात मुलांना अक्षरश: कोंबून त्यांची वाहतूक केल्याचे चित्र लातुरात दिसून आले. विद्यार्थ्यांची गरसोय होऊ नये म्हणून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. नियमाप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक न करणाऱ्या ११ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या सर्व वाहनांची एक महिन्यासाठी नोंदणी निलंबित करण्यात येणार आहे. ज्या वाहनांना स्कूलबसचा परवाना नाही त्या वाहनात पाल्यांना बसवू नये. आसन क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केली जाते त्या स्कूलबसमध्ये पाल्यांना पाठवू नये. ऑटो रिक्षामधून पाल्यांना पाठवताना त्या रिक्षात पाचपेक्षा जास्त विद्यार्थी बसले नाहीत ना याची खात्री करावी, असे आवाहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करणे, परिवहन शुल्क, बसथांबे निश्चित करणे यासाठी शाळांनी परिवहन समिती गठीत करणे बंधनकारक केले आहे. तीन महिन्यांतून एकदा प्रत्येक सत्र सुरू होण्यापूर्वी समितीची बठक घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात रिक्षा व टमटममध्ये १५ ते २० मुलांना बसवून त्यांची सर्रासपणे वाहतूक केली जात आहे. याकडे शाळा, महाविद्यालयांचे सर्रास दुर्लक्ष होत आहे. अशा अवैध वाहतुकीकडे या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आर. टी. गिते, व्ही. ए. जाधव, एस. एन. सोनटक्के आदी यासाठी पुढाकार घेत आहेत.
विद्यार्थ्यांना ‘कोंबणाऱ्या’ ११ वाहनांवर कारवाई
स्कूलबसच्या नावाखाली विनापरवाना विद्यार्थ्यांची मोठय़ा प्रमाणात वाहतूक केली जात आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने अशा वाहनांची कडक तपासणी करून कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
First published on: 21-06-2014 at 01:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School bus checking action