School Girl : सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये मुलींचा एक ग्रुप एका शाळकरी मुलीला मारहाण करत असताना दिसत आहे. फ्रि प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडिओ वर्सोव्यातील यारी रोड परीसरातील आहे.

व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे शाळेचा गणवेश घातलेल्या एका मुलीला दिवसाढवळ्या मुलींच्या गटाकडून निर्दयीपणे मारहाण केली जात आहे. तसंच, मारहाण करताना या मुली तिला शिवीगाळही करत आहे. या मुलींनी तिचे केस ओढले अन् तिला लाथाही मारताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पीडितेने या हल्ल्यातून कसंतरी स्वतःची सुटका करून घेतली. परंतु, मुलींनी तिला पुन्हा एकदा पकडलं आणि तिला मारहाण सुरू ठेवली. यावेळी तिला खराब पाण्यात टाकण्याचाही प्रयत्न करण्यात आला. अखेर काही मुलांनी तिची सुटका केली आणि तिला जाण्याची विनंती केली.

Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
School Girl Uniform
संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा
Mumbai Girl Suicide
Mumbai Crime : मुंबईतल्या शाळेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या, बुटाच्या लेसने गळफास घेत आयुष्य संपवलं
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”
Video of Mothers Anger Over Sons Hair Growth
“डोक्यावर झिपऱ्या आहे.. ते काप..” मुलाची हेअर स्टाइल बघून आईला आला संताप, पाहा मजेशीर VIDEO

हेही वाचा >> Video: ज्या सापाने दंश केला, त्याला पकडून व्यक्ती पोहोचला थेट रुग्णालयात; म्हणाला, “लवकर…”

दरम्यान, ही घटना घडत असताना आजूबाजूला अनेकजण उभे होते. पण या मुलीला वाचवण्याकरता कोणीही आले नाही. बाजूला एक सिलिंडर पोहोचवणाराही उभा आहे. परंतु, त्यानेही यात हस्तक्षेप केला नाही. या मुलीला सतत मारण्याचा प्रयत्न केला जात होता. तिने स्वतःची सुटका करून घेतल्यानंतरही तिला पकडून मारलं जात होतं. अखेर तेथे उभे असलेल्या दोन मुलांनी त्यांच्या तावडीतून बाहेर काढलं आणि तेथून जाण्यास सांगितलं.

हल्ला करणाऱ्या मुलींवर कारवाई करा

हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून अनेकांनी या हल्ल्यात सहभागी असलेल्या मुलींच्या गटावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, ही घटना केव्हा घडली किंवा आरोपी मुलींवर कुठलीही कारवाई करण्यात आली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शाळकरी मुलींच्या तोंडी असलेली भाषा अन् त्यांचं कृत्य पाहून अनेक नेटिझन्सने संताप व्यक्त केला आहे. तसंच बघ्याची भूमिका घेतलेल्या लोकांवरही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी करण्यात येतेय.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अनेक अशा अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये अशी मानसिकता का तयार होतेय, यावरही विचार करण्याची गरज असल्याचं काही नेटिझन्स म्हणत आहेत. शिकण्याच्या वयात या मुला-मुलींमध्ये क्रुरता कुठून येते, यामागचं मानसशास्त्र जाणून घ्यायला हवं, असंही काहीजण म्हणाले.

Story img Loader