देशासह राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते राजकीय नेत्यांपार्यंत अनेकांना करोनाची लागण होत आहे. पुणे, मुंबई, ठाणे अशा मोठ्या शहरांमध्येही पुन्हा करोनाचा प्रसार होत आहे. असे असताना राज्यात पुन्हा एखदा नव्या शैक्षणिक वर्षांतर्गंत येत्या १५ जूनपासून शाळा सुरु होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात शाळा पुन्हा बंद होणार की शाळा सुरुच राहणार यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शाळा बंद करणे चुकीचे असल्याचे गायकवाड म्हणाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> “काश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे नेहमीच खुले, आता ठोस कारवाई करणार”

“सध्या करोना वाढत आहे त्यामुळे आम्हाला निश्चितच काही निर्णय घ्यावे लागतील. सध्या शाळा सुरु करणे गरजेचं आहे. या महिन्याच्या १५ तारखेला शाळा सुरु होतील. मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता शाळा सुरु ठेवणे अवश्यक आहे. शाळा, शिक्षक, वही असं वातावरण असणं आवश्यक आहे. मागील दोन वर्षांमध्ये दुसरीची मुलं शाळेतच आलेली नाहीत. त्यामुळे योग्य ती काळजी घेण्याचा आम्ही प्रयत्न करु,” असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

हेही वाचा >> “…तर बाळासाहेबांनी पेकाटात लाथ घातली असती,” संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनसेची टीका

तसेच “शाळा सुरु करण्यापूर्वी टास्क फोर्सशी आम्ही चर्चा करू आणि नंतरच एसओपी जाहीर करु. सध्या सर्व मुलांची करोना चचणी करण्याची गरज नाही. सध्या राज्य आणि केंद्र सरकारचे करोना प्रतिबंधक नियम वेगळे आहेत. त्यामुळे टास्क फोर्सशी चर्चा करुनच एसओपी जारी केली जाईल,” असेदेखील वर्षा गायकवाड म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School will not be keep closed because of coronavirus prd