सांगली : पंधरा-सोळा वर्षाचं नकळत वय. पण वाढदिवसाला आईने नवीन भ्रमणध्वनी दिला नाही म्हणून गच्चीवर जाउन गळफास लावून घेत त्यांने जीवनच संपवून टाकले. ही घटना मिरजेत घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सदर मुलघा एका खासगी शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता.  शाळेत शिक्षण घेत असतानाच त्यांने मैदानावर फुटबॉलमध्येही चांगली चमक दाखवली होती. दोन दिवसापुर्वी त्याचा वाढदिवसही आईने मोठ्या उत्साहाने साजरा केला होता. या वाढदिवसाला त्यांने आईकडे मोबाईलची मागणी केली होती. मात्र, आई औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला जाउन संसाराचा गाडा हाकत असताना आर्थिक चणचणीमुळे एकुलत्या एका मुलाचा हट्ट ती पुरवू शकली नाही. यामुळे तो दोन दिवस उदास भासत होता. आज ना उद्या तो सुधारेल असे म्हणून आई व बहिण त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. अखेर आई व बहिण झोपल्यानंतर गङ्खीवर असलेल्या सौर उर्जेच्या अँगलला गळफास लावून त्यांने आत्महत्या केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Deputy Chief Minister Eknath Shinde on a tour of Dare village
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे दौऱ्यावर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ajit Pawar Statement About Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Murder : अजित पवारांचं संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत भाष्य; “सिव्हिल सर्जन म्हणाला, पोस्टमॉर्टेम करताना आजवर इतकी वाईट…”
Allu Arjun House Attack
Allu Arjun House Attack : अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला, घरात घुसून तोडफोड; आठ जण ताब्यात
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Mahabaleshwar Revenue takes strict action against unlicensed mining satara news
विनापरवाना उत्खननावर महाबळेश्वर महसूलची धडक कारवाई
Story img Loader