अलिबाग: रायगड पोलीस भरती कॉपी प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. इलेक्ट्रॉनिक डिवाईस कॉपीच्या साह्याने घडवलेल्या या कॉपी प्रकरणात राज्यभरातून १० जणांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेनी ही कारवाई केली असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पवन त्रंबक बमनावत (वय २५ नळणी जि. जालना), नारायण निवृत्ती राउत (वय २९ रा. नाळवंडी, जि.बिड), प्रताप उर्फ भावडया शिवसिंग गोमलाडू (वय २५ रा. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर), कुमारी नागम्मा हनुमंत इबीटदार (वय २० रा. देगलूर जि. नांदेड), अर्जुन नारायण बेडवाल (वय २४ रा. परसोडा जि. छत्रपती संभाजीनगर), मंगेश बालाजी चोले उर्फ चोरमले सर (वय ३४ रा. जळकोट, लातूर), संतोष सांडू गुसिंगे (वय ३० रा. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर), कुमारी पुनम राम वाणी (वय २३ रा. पडेगाव जि. छत्रपती संभाजीनगर), जीवन मानसिंग नायमने उर्फ एस. राठोड उर्फ करण जाधव (रा. जोडवाडी, जि. छत्रपती संभाजीनगर) जालींदर श्रीराम काळे (वय ३२ वर्षे रा. नाळवंडी जि.बिड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा – रायगड जिल्ह्यातील पाच हजार लोकवस्तीचे गाव स्वयंप्रकाशित होणार

१० ऑगस्ट २०२४ रोजी रायगड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर सर्वसाधारण पोलीस शिपाई एकूण ३९१ पदाकरीता लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी अलीबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ७ परिक्षा केंद्रांवर एकूण १९४० पुरुष व ११७५ महिला तसेच पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील एकूण ४ परिक्षा केंद्रांवर एकूण १६३२ पुरुष उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात आली. परिक्षा केंद्रामध्ये प्रवेश करणारे परिक्षार्थी उमेदवारांची तपासणी करत असताना अलिबाग पोलीस ठाण्याचे हददीमधील ४ परिक्षा केंद्रांवर ५ व पेण पोलीस ठाण्याचे हद्दीमधील १ परिक्षा केंद्रावर १ असे एकूण ६ परिक्षार्थी यांच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक ब्लूटूथ डिवाईस मिळून आले. त्यांना अटक करण्यात आली होती.

कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, रायगड-अलीबाग यांच्याशी चर्चा करून या गुन्ह्याचे तपास अधिकारी रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे व इतर पोलीस अधिकारी यांची तातडीने बैठक बोलावून गुन्ह्याचा खोलवर तपास करण्याकरीता मुख्य सूत्रधार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक नेमण्याचे आदेश दिले. त्यांना मदतीसाठी सायबर विशेष पथकाची देखील नेमणूक करून त्यामध्ये सायबरचे उत्तम ज्ञान असणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना नेमण्यात आले. सायबर पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे नविन तंत्रज्ञानाचा उत्तम प्रकारे वापर करून परिक्षार्थी विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या इतर आरोपींची माहिती विशेष तपास पथकातील पोलीस अधिकारी यांना देवून त्यांनी अथक परिश्रम घेवून कौशल्यपूर्ण तपास करून इतर चार आरोपींना अटक केली.

हेही वाचा – धाराशिव : ओबीसीतूनच आरक्षण द्या! जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बंदला प्रतिसाद

या गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे रसायनी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय बांगर, स्थानिक गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी, साहाय्यक पोलीस निरीक्षक निरीक्षक भोसले, पोलीस उपनिरीक्षक नरे, पोलीस उपनिरीक्षक सरगर, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scope of raigad police recruitment copy case increased ten people were arrested from across the state action by local crime department ssb