सोलापूर-तुळजापूर मार्गावर शनिवारी सकाळी शालेय सहलीच्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना ताजी असताना, शनिवारी दुपारी मनमाड-मालेगाव रस्त्यावर स्कॉर्पिओ आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली.
या भीषण अपघातात स्कॉर्पिओमधील आठ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. अपघातातील जखमींना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्कॉर्पिओ मध्यप्रदेशहून शिर्डीच्या दिशेने येत असताना, हा भीषण अपघात झाला.
(संग्रहित छायाचित्र)