|| अक्षय मांडवकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गावखडी, हरिहरेश्वर किनाऱ्यावर ४३८ अंडी

यंदाच्या मोसमातील समुद्री कासवांच्या विणीच्या हंगामाला राज्याच्या सागरी किनारपट्टीवर सुरुवात झाली आहे. रत्नागिरीतील गावखडी आणि दोपोली तालुक्यातील हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या मादी कासवाने अंडी दिली आहेत. या दोन्ही किनाऱ्यांवर देण्यात आलेल्या अंडय़ांची संख्या ४३८ आहे.

दरवर्षी थंडीच्या दिवसात रायगड जिल्ह्य़ातील चार आणि रत्नागिरी जिल्ह्य़ातील १४ किनाऱ्यांवर कासवांमधील ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या दरवर्षी अंडी घालण्यासाठी येतात. गेल्या वर्षी कोकण किनारपट्टीवर सागरी कासवांची सुमारे २४० घरटी आढळून आली होती. तर यंदाच्या विणीच्या हंगामातील पहिली दोन घरटी गावखडी किनाऱ्यावर आणि दोन घरटी हरिहरेश्वर किनारपट्टीवर  आढळून आली आहेत.

१० डिसेंबर आणि ३ जानेवारी रोजी किनाऱ्यावर दोन घरटी आढळून आल्याची माहिती गावखडीचे कासवमित्र प्रदीप डिंगणकर यांनी दिली. यामधील पहिल्या घरटय़ात १२२ आणि दुसऱ्या घरटय़ात १०७ अंडी सापडल्याचे त्यांनी सांगितले. अंडय़ांच्या संवर्धनाच्या दृष्टीने त्यांना किनाऱ्यावरच बांधलेल्या कृत्रिम हॅचरीमध्ये हलविल्याचे डिंगणकर म्हणाले. पुढील ५३ ते ५५ दिवसांसाठी या अंडय़ांची काळजी वनविभाग, ‘निसर्गयात्री’ संस्था आणि गावखडी ग्रामपंचायतीच्या मदतीने घेतली जाणार आहे. तर हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर मादी कासवाने दोन घरटी दिली असून त्यामध्ये प्रत्येकी १४३ आणि ६६ अंडी आढळ्याचे कासवमित्र संतोष मयेकर यांनी सांगितले.

चार घरटी आढळल्याने कोकण किनारपट्टीवर समुद्री कासवांच्या प्रजननाला सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये रत्नागिरीसह रायगड जिल्ह्य़ातील किनाऱ्यांवर मादी कासव अंडी घालण्यासाठी येतील. मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही थंडी उशिरा सुरू झाल्याने विणीच्या हंगामास विलंब झाला आहे. – मोहन उपाध्ये, तज्ज्ञ कासवमित्र

अंडय़ांची जपणूक

समुद्राच्या भरतीरेषेपासून दूर अंडी उबविणारी यंत्रणा उभारली जाते. अंडी उबविण्याच्या या यंत्रणेत मादी कासवाने केलेल्या खड्डय़ासारखा खड्डा तयार केला जातो. त्यात ही अंडी ठेवून त्यावर वाळू टाकली जाते. त्याभोवती कुंपण घालून अंडय़ांमधून बाहेर पडलेली पिल्ले इतरत्र जाऊनयेत म्हणून त्यावर जाळीचे टोपले ठेवण्यात येते.