दिवसाचे २४ तास व २६५ दिवस सुरक्षाचक्र सुरू ठेवल्यास सुरक्षा संस्कृती उदयास येईल. अशी संस्कृती औद्योगिक वसाहतीत व कारखान्यांमध्ये आवश्यक असल्याचे मत औद्योगिक पर्यावरण, सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक आर. डी. दहिफळे यांनी मांडले. सुरक्षा सप्ताहानिमित्त येथे नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) यांच्या वतीनेउद्योगात घ्यावयाची सुरक्षेसंबंधी काळजी या विषयावर सोमवारी पोस्टर व घोषवाक्य स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
ज्योती स्ट्रक्चर्सचे वरिष्ठ महाव्यवस्थापक पी. पी. मिश्रा यांच्या हस्ते व औद्योगिक पर्यावरण, सुरक्षा, आरोग्य विभागाचे उपसंचालक आर. डी. दहिफळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन निमा हाऊस येथे झाले. व्यासपीठावर औद्योगिक पर्यावरण, सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक आर. डी. दहिफळे, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, मानद सरचिटणीस मंगेश पाटणकर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर, कार्यकारी अभियंता एस. आर. तुपे, सी. यू. पाटील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी ए. एस. फुलसे आदी उपस्थित होते.
उपसंचालक दहिफळे यांनी औद्योगिक सुरक्षेचे महत्त्व मांडले. जगण्यासाठी ऊन, वारा, पाऊस यापासून आपण काळजी घेतो तशी कारखान्यात काम करताना घेणे आवश्यक आहे. उद्योगात सुरक्षा महत्त्वाची असून कारखान्यातील वातावरण, यंत्र कच्चा माल, उत्पादन या सर्व बाबींची उत्पादन प्रक्रिया करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सुरक्षा म्हणजे काळजी घेणे. अपघात हे अचानक घडतात. काळजी घेतल्यास अपघात टळू शकतात. अपघाताची संख्या कमी होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. पी. पी. मिश्रा यांनी उदाहरणांद्वारे सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी कारखान्यात उत्पादन करत असताना सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी निमातर्फे या स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. आयईएसएच उपसमितीचे अध्यक्ष समीर पटवा यांनी प्रास्ताविक केले. पोस्टर व स्लोगन स्पर्धेत ७० टक्के बडय़ा उद्योगांनी सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर नागरी संरक्षण गृह विभागाचे उपनियंत्रक किसन सांगळे यांनी चित्रफितीद्वारे पाण्याची बचत, सुरक्षा व पूरस्थितीत घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन आयईएसएच उपसमितीचे सदस्य एस. जे. आवलगांवकर यांनी केले. आभार मंगेश पाटणकर यांनी मानले. १९ मार्च हा प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.
कारखान्यांमध्ये सुरक्षा संस्कृती आवश्यक – आर. डी. दहिफळे
दिवसाचे २४ तास व २६५ दिवस सुरक्षाचक्र सुरू ठेवल्यास सुरक्षा संस्कृती उदयास येईल. अशी संस्कृती औद्योगिक वसाहतीत व कारखान्यांमध्ये आवश्यक असल्याचे मत औद्योगिक पर्यावरण, सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक आर. डी. दहिफळे यांनी मांडले.
First published on: 19-03-2013 at 04:06 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security culture must in factory