कुख्यात गुंड सल्या चेप्यावरील गोळीबार प्रकरणातील ३ आरोपींना शहर पोलिसांनी गजाआड केले. गुन्ह्यात वापरलेली एमएच ०२ वाय ६५०० या क्रमांकाची मारुती कार जप्त करण्यात आली आहे. युवराज सर्जेराव साळवे (वय ३०, रा. कोपर्डे हवेली), सुरज ऊर्फ बाळू सर्जेराव पाटील (वय २३, मंगळवार पेठ कराड), संकेत नारायण पवार (वय १९ रा. बनवडी ता. कराड) अशी आज शरण आलेल्या तिघांची नावे आहेत.
येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात ३० ऑगस्ट रोजी कुख्यात गुंड सल्या चेप्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत सहा जणांना अटक केली होती, तर उर्वरित तीन संशयित आरोपी फरारी होते तेही आज अटक  झाले आहेत.
हल्लेखोरांनी दोन रिव्हॉल्हरमधून सलीमवर बेछूट गोळीबार केल्याने तो गंभीर जखमी  असून, सध्या मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. याप्रकरणी आतापर्यंत भानुदास लक्ष्मण धोत्रे (वय ३३, रा. शनिवार पेठ, कराड), अनिल शंकर चौगुले (वय ३२, रा. शिवाजी स्टेडियमजवळ, कराड), जयवंत सर्जेराव साळवे (वय २९, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड), किरण गुलाब गावित (वय २३, अण्णा नांगरेनगर, विद्यानगर-सैदापूर), अमोल संपत मदने (वय २५, रा. सैनिक कॉलनी, बनवडी), मंदार कृष्णदेव कदम (वय २५, रा. करवडी, ता. कराड) या सहा जणांना अटक करण्यात आली होती. आज तिघांना अशी एकूण ९ जणांना याप्रकरणी अटक झाला आहे. या प्रकरणाचा तपास कराड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी. आर. पाटील हे करीत आहेत.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा