सांगली: जिल्ह्यातील ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जप्त करण्यात आलेला सुमारे सव्वा कोटींचा गांजा न्यायालयीन प्रक्रियेनंतर जाळून नष्ट करण्यात आला. १९९८ पासून हा गांजा गोदामामध्ये पोलिसांच्या गोदामामध्ये बंदिस्त होता.
जिल्ह्यातील जत, उमदी, मिरज ग्रामीण व शहर, महात्मा गांधी चौक, सांगली शहर व ग्रामीण, विटा, कासेगाव आणि तासगाव पोलीस ठाण्यात १९९८ पासून २०२२ पर्यंत विविध ठिकाणी गांजा जप्त करून ४५ गुन्हे संबंधित पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. यावेळी जप्त करण्यता आलेला १ हजार २०५ किलो ३२२ ग्रॅम गांजा नष्ट करण्यासाठी पोलीसांनी न्यायालयाची परवानगी घेउन शुक्रवारी बॉयलरमध्ये जाळून भस्म करण्यात आला. जाळण्यात आलेल्या गांजाचे मूल्य १ कोटी २० लाख रूपये होते.
आणखी वाचा-सातारा : घोरपड शिकारीच्या गुन्ह्यामध्ये वन खात्याकडून एकजण गजाआड
यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली व समिती सदस्यांसह प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जातीने उपस्थित होते. यामुळे प्रदुषण होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली.