येथील अंजली कॉलनीतील संजय सदाशिव तवर याच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिका-यांनी धाड टाकून ४ लाख २७ हजार ६२० रुपयांचा गुटखा हस्तगत केला.
या बाबत अधिक माहिती देताना सहायक आयुक्त रामिलग बोडके यांनी सांगितले. या कारवाईत गोवा गुटखा १००० लाल, १००० हिरवा, राज कोल्हापुरी गुटखा, हिरा, आरएमडी, आरएमडी पान मसाला, एमची विंग टोबॉको असे सहा पोत्यांमधला गुटखा जप्त केला. या पूर्वीही तवर याच्या कडून पावणेदोन लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता. या कारवाईत इम्रान हवालदार, सुरेश दांगट, उदय लोहकरे, वंदना रूपनवर आणि शुभांगी अंकुश यांनी भाग घेतला होता.

Story img Loader