राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. १००० चौरस फुटाच्या दुकानातच वाईन विक्री करता येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबद्दल बोलताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले, महाराष्ट्रात बऱ्याच वाईनरी असताना आता १००० चौरस फुटांच्या छोट्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावर वाईनरी चालते. त्यांना चालना देण्यासाठी वाईन विक्री करता येणार आहे.

राज्यात नवी वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार १ हजार कोटी लीटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीनं आता राज्य सरकारनं पाऊलं टाकायला सुरुवात केली आहे.

सध्या राज्यात वाईनची दरवर्षी ७० लाख लिटरची विक्री होते. सरकारच्या या नव्या धोरणामुळं हा आकडा १ हजार कोटी लिटरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. अनेक बेकरी पदार्थांमध्ये वाईनचा उपयोग होत असतो. बहुतेक वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे वाईनचा वापर चवीसाठी केला जात असतो. त्यामुळे दैनंदिन किराणा दुकानात होणाऱ्या वाईनची विक्री ही बीअरच्या धर्तीवर कॅनमधून करण्याची मागणी होत आहे.

उत्पादन शुल्कानं या आधीच आयात व्हिस्कीवरील शुल्क ३०० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणले आहे. आता सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selling wine in super markets maharashtra government decision on wine nawab malik vsk