भाजपपाठोपाठ शिवसेनेनेही बाजीराव-मस्तानी चित्रपटात इतिहासाची तोडफोड केल्याचा आरोप करीत दोन गाणी व आक्षेपार्ह भाग वगळण्याची मागणी केली.शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी विधानसभेत यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. इतिहासाचा विपर्यास करणारा काही भाग चित्रपटात असून तो वगळण्यात यावा. चित्रपट प्रदर्शनाआधी आमदारांना दाखविण्यात यावा. वादग्रस्त भाग काढल्यावरच प्रदíशत करावा, अशी मागणी त्यांनी केली.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2015 रोजी प्रकाशित
शिवसेनेचाही बाजीराव-मस्तानी चित्रपटाला आक्षेप
शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी विधानसभेत यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला.
Written by रत्नाकर पवार

First published on: 11-12-2015 at 06:23 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sena also against bajirao mastani