अकोला पश्चिमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचं निधन झालं आहे. आमदार शर्मा हे मागील अनेक दिवसांपासून आजारी होते. शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली आहे. गोवर्धन शर्मा यांच्या मृत्यूनंतर भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावनिक प्रतिक्रिया देत श्रद्धांजली वाहिली आहे.

‘एक्स’वर लिहिलेल्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अकोला पश्चिमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. लालाजी या नावाने सुपरिचित असलेले गोवर्धनजी कायम जनतेत राहणारे होते. लोकांच्या दु:खात कायम आणि हक्काचा मदतीचा हात अशीच त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने मी माझा ज्येष्ठ सहकारी आणि एक पक्षनिष्ठ, ध्येयवादी नेता गमावला आहे. पक्षाची ही अपरिमित हानी आहे.”

sant Tukaram maharaj suicide news in marathi
देहूत जगद्गुरू संत तुकोबांच्या वंशजाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
pune crime news
पुणे : लग्नाची मागणी केल्याने बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, गोखलेनगर भागातील घटना
Vakrangee Technology, Dinesh Nandwana Death ,
मुंबई : ईडीची निवासस्थानी शोधमोहीम सुरू असताना व्यावसायिकाचा मृत्यू
new ST buses in phased manner 110 buses have been made available
जेजुरी बसस्थानकात चालकाचा हृदयविकाराने मृत्यू
thane garbage collector sleeping on footpath killed by car
पदपथावर झोपलेल्या कचरा वेचकाच्या शरिरावरून मोटार गेल्याने मृत्यू
36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू
Two children aged 2 and 17 died accidentally in separate incidents in Badlapur Kalyan East
कल्याण, बदलापूरमध्ये दोन बालकांचा अपघाती मृत्यू

“अकोला जिल्ह्यात पक्षाचे शहर अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष अशा विविध जबाबदार्‍या सांभाळत पक्षविस्तारात त्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले. नगरसेवक, आमदार, राज्यमंत्री आदी विविध जबाबदार्‍यांमधून त्यांनी जनतेची सेवा केली. विठ्ठल मंदिराचा जिर्णोद्धार तर त्यांनी केलाच. पण, या मंदिराच्या माध्यमातून त्यांनी धार्मिक क्षेत्रातही मोठे कार्य केले. शिक्षण, सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. अगदी अलीकडे मुंबईत त्यांना उपचारासाठी आणण्यात आले तेव्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. राममंदिराच्या आंदोलनात सक्रिय सहभाग, अकोल्यातील रामनवमी शोभायात्रेची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या निधनाने एक सच्चा रामभक्त आम्ही गमावला आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती ईश्वराने त्यांच्या कुटुंबीयांना आणि सर्व कार्यकर्त्यांना द्यावी, अशी मी प्रार्थना करतो,” अशा शब्दांत फडणवीसांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.

Story img Loader