सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या समूहाने लोकशाही सुदृढ करण्याच्या हेतूने मतदान जनजागृती करण्यासाठी रखरखत्या उन्हाची आणि प्रकृतीची पर्वा न करता एस.टी. बसस्थानकावर सभा मंडप उभारून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करणारी पत्रके वाटण्याचा स्तुत्य उपक्रम चालवला आहे.
बसस्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक बसमध्ये जाऊन प्रवाशांना पत्रके वाटली. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष राज्यात सर्वोत्तम ज्येष्ठ संघाचा प्रथम पुरस्कार मिळवणाऱ्या बळवंतराव चिंतावार यांच्या नेतृत्वाखालील ही मतदान जनजागृती मोहीम सर्वत्र स्पृहणीय चच्रेचा विषय झाला आहे. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त संख्येने मतदान व्हावे, मतदारांमध्ये मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मतदार जनजागृती रॅलीचे करण्यात आले होते. या रॅलीला शहरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी हिरवी झेंडी दाखवून या रॅलीचा शुभारंभ केला.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, निवडणूक उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी व मतदार जनजागृती अभियानाचे नोडल ऑफिसर ज्ञानेश भट यांच्यासह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यासमोरून शहरातील प्रमुख मार्गावरून जनजागृती करत ही रॅली शहरात फिरली. रॅलीत सहभागी नागरिकांनी जनजागृती फलकाव्दारे मतदानाचे महत्व पटवून देत मतदान करण्याचे आवाहन केले. रोटरी क्लबच्या पुढकराने निघाला समाजसेवी संघटना सहभागी होत्या.