सोलापूर जिल्ह्यातील शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार भाई संपतराव मारूती तथा एस.एम. पाटील (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने व अल्प आजाराने पुण्यातील एका खासगी रूग्णालयात रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास निधन झाले. जिल्ह्यात शेकापच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर व कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी अनेक वर्षे चळवळ उभी केली होती. रयत शिक्षण संस्थेचे ते उपाध्यक्ष तर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तब्बल ४० वर्षे संचालक व जिल्हा परिषदेचेही ते काही वर्षे सदस्य होते.

१९५२ ते १९६२ पर्यंत माढा विधानसभा मतदारसंघ राखीव होता. त्यानंतर १९६७ साली हा मतदारसंघ खुला झाल्यानंतर शेकापतर्फे भाई एस.एम.पाटील हे प्रथमच विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर १९७२ व १९७८ सालीही त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. जलतज्ज्ञ अनिल पाटील यांचे ते वडील होत. त्यांचे पार्थिव सांयकाळी पुण्याहून वरवडे (ता. माढा) या त्यांच्या मूळगावी आणण्यात येणार आहे.

Appointment of two headmasters in the same municipal school
मुंबई : पालिकेच्या एकाच शाळेत दोन मुख्याध्यापकांची नियुक्ती
5th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
५ सप्टेंबर पंचांग: गुरुवारी १२ पैकी कोणत्या राशीवर बरसणार स्वामींची कृपा? दुःख-संकट दूर तर प्रचंड धनलाभ होणार; वाचा तुमचे भविष्य
Jay Shah Net worth is 124 Crore via Business Read here everything about his education and personal life
Jay Shah Net Worth: गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव, विविध व्यवसायातून दमदार कमाई, ३५व्या वर्षी आयसीसीचे बॉस; किती आहे जय शाहांची संपत्ती?
Sunil Gavaskar Statement on Jay Shah ICC President Post
Sunil Gavaskar on Jay Shah: ‘जय शाह ICC चे अध्यक्ष झाले तर भारतीय क्रिकेट…” सुनील गावसकरांचे शाह यांच्या अध्यक्षपदाच्या चर्चांवर मोठे वक्तव्य
Kalpana Chavan
चंद्रपूर: वादग्रस्त शिक्षणाधिकारी निलंबित
Badlapur Sexual Assault Case Deepak Kesarkar
Badlapur Sexual Assault : बदलापूरच्या शाळेतील CCTV फूटेज गायब! चौकशी समितीचा अहवाल समोर, शिक्षणमंत्री म्हणाले, “वर्गशिक्षिकेला…”
Free facility for delivery of women in nagpur by dr ashish deshmukh
लाडक्या बहिणींच्या बाळंतपणासाठी नि:शुल्क सुविधा… माजी आमदाराने…
Sharad Pawar-Sunita Kejriwal meeting in Pune
शरद पवार-सुनीता केजरीवाल यांची पुण्यात भेट