आता ग्रामीण व शहरात महिला संघटनांवर भर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नक्षल चळवळीतील महिला संघटन मजबूत करून ग्रामीण व शहरी भागात स्वतंत्र महिला चळवळीची निर्मिती करावी, चळवळीत सक्रीय महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार द्यावेत, चळवळीत सक्रीय नक्षलवादी व नक्षल नेत्यांच्या पत्नीला, तसेच कुटुंबाला चळवळीत सक्रीय करण्याचे निर्देश वरिष्ठ नक्षलवाद्यांनी दिले आहेत.

व्यंकटापूर चकमकीदरम्यान सापडलेल्या नक्षल साहित्यातून ही माहिती समोर आली आहेत. या चळवळीतील महिला संघटन मजबूत करण्यासाठी महिला चळवळीवर केंद्रित होण्यासाठी दलांमधील महिला पार्टी सदस्यांकडे या चळवळीची जबाबदारी सोपविण्यात यावी, स्कॉड एरियात महिला चळवळ समस्यांवर दलम बैठकीत नियमित अजेंडा ठेवून चर्चा करून योग्य पध्दती तयार करून घ्यावी, महिला चळवळीची माहिती देण्यासाठी दलमला एरिया महिलांना वर्षांतून एकदा वर्ग घ्यावे, पुरुषाधिक्य दलांमधून व लोक संघाकडून हटविण्यासाठी योग्य प्रयत्न करावे, असेही नक्षल नेत्यांनी सुचविले आहे. ग्रामस्थर महिला संघाची निर्मिती करण्यावर केंद्रित होऊन संधी असलेल्या सब एरिया किंवा एरिया कार्यवर्गाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करावे, ग्रामीण महिला संघ गुप्तपणे निर्माण करून संधी असलेल्या ग्रामीण, शहरी प्रांतात कव्हर संघामध्ये काम करावे, पार्टी सेलमध्ये ग्राम समितीत महिलांची पुरुषांशी तुलना करताना स्तरात थोडा फरक असला तरी सामावून घ्यावे, असेही निर्देश दिले आहेत. महिलांना संघात येण्यासाठी त्यांचे कुटुंबीय विरोध करत असल्याने नक्षल सदस्यांना, नेत्यांच्या पत्नीला पहिले चळवळीत आणण्यासाठी प्रयत्न करावे, चळवळीत सक्रीय पुरुषांना पहिले महिला चळवळीची आवश्यकता व प्राधान्य, याबाबत सविस्तर माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

नवलोकशाही क्रांतीला यशस्वी करण्यासाठीच बळकट महिला चळवळ निर्माण करावी, असेही नक्षलवाद्यांचे म्हणणे आहे. पीडितांसाठी कार्य करणाऱ्या सर्व संघर्षांत महिलांना सहभागी करावे, पितृशाहीविरुध्द संघर्ष करावे, लोकशाही क्रांती संघर्षांतील भाग म्हणून शेतमजूर व गरीब शेतकऱ्यांच्या जमीनदार मालमत्तेत महिलांना पुरुषांच्या समान भागिदारीसाठी संघर्ष करावा, वारसाने लाभलेल्या मालमत्तेत अर्जित केलेल्या मालमत्तेत सर्व महिलांना पुरुषांच्या समान वाटा देण्यासाठी संघर्ष, समान कामासाठी समान वेतन, साम्राज्यवादी व भांडवलदारांनी प्रोत्साहन देत असलेल्या अश्लील, असभ्य प्रचारांचा अंत करावा, वेश्याव्यवसाय पूर्णपणे बंद करावा, साम्राज्यवादी संस्कृतीविरुध्द महिलांना संघर्षांसाठी एकत्र आणावे, महिलांवरील हिंसक कृत्याचा अंत करण्यासाठी संघर्ष करावा, हुंडा दुराचाराचा अंत करणे, पारंपरिक व थाटामाटात केले जाणारे विवाह बंद करण्यासाठी संघर्ष करावा, आंतरजातीय, आंतरधर्मीय व विधवा विवाहांना प्रोत्साहन द्यावे, तसेच बालविवाहाचा विरोध करून बहुपत्नीत्व व आदिवासींमध्ये रुजलेल्या लग्नांच्या दुराचाराविरुध्द महिलांनी संघर्ष करावा.

राज्य व केंद्र सरकारी नोकरीत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असावे, यासाठी लढा उभारावा, महिलांना मोफत शिक्षणासाठी मुलामुलींना सामूहिक शाळेसाठी संघर्ष करावा, विद्याविभागात स्त्रियांसोबत असभ्य वर्तन रॅगिंगविरुध्द, शहरांमध्ये रस्त्यांवरील छळाविरुध्द संघर्ष करावा, गर्भस्त, शिशूंचा लिंग निर्धारणव्दारे स्त्री भृण हत्येचा विरोधात, तसेच महिलांच्या आरोग्यास हानिकारक असे लोकसंख्या नियंत्रण कृत्याविरुध्द संघर्ष करण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी चळवळीतील महिलांना केले आहे. महिलाविरोधी धार्मिक कर्मकांड धर्मतत्ववाद मनुधर्मशास्त्रविरूध्द संघर्ष करावा, जोगिनी वासिनीमध्ये बदलविणाऱ्या दुराचाराविरुध्द संघर्ष करण्याचे आवाहन केले आहे. प्रचार माध्यमांमध्ये महिलांना कमी लेखण्याविरुध्द जोरदार संघर्ष करण्याचे आवाहनही नक्षलवाद्यांनी महिला संघटनेला केले आहे.