लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : महायुतीतील काही लोक त्रास देतात, त्यांना त्यांच्या वरिष्ठांनी समज द्यावी, अन्यथा अरेला कारे करण्याची शिवसेनेची भूमिका आम्हाला घ्यावी लागेल असा सूचक इशारा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विट्यात झालेल्या शेतकरी मेळाव्यात दिला.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत

शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, माजी नगरसेवक अमोल बाबर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, योगेश जानकर आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी आटपाडीचे तानाजी पाटील आणि सुहास बाबर यांनी आटपाडीतील भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर, ब्रम्हानंद पडळकर, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांचे नाव न घेता तकारीचा पाढा वाचला.

आणखी वाचा-VIDEO : “२०१९ साली ‘कट्यार पाठीत घुसली’ हा प्रयोग झाला, मग आम्ही…”, ठाकरेंना लक्ष्य करत फडणवीसांची फटकेबाजी

मंत्री देसाई म्हणाले की, आमदार बाबर यांनी मला मंत्रीपद नाही दिले तरी चालेल, मात्र माझ्या भागासाठी महत्त्वाचा असणारा टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याची मंजुरी आणि त्याला निधीची तरतूद झाली पाहिजे, असे अगदी उठावाच्यावेळी सांगितले होते. सत्तेमध्ये तिसरा पक्ष आल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार वेगळ्या पद्धतीने झाला. अन्यथा आमदार बाबर कधीच मंत्री झाले असते. आता नव्याने आलेले काही लोक त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. आता असा एखादा चुटपूट नेता उलटे काही करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल. हा विषय आम्ही आम्ही महायुतीच्या आगामी समन्वय समितीच्या बैठकीत घेणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

मंत्री सामंत म्हणाले, आमदार बाबर यांनी एमआयडीसीची मागणी केली आहे, तुम्ही जागा सुचवाल तिथे एमआयडीसी करू, त्यासाठी आताच तांत्रिक मंजुरी दिली, असे जाहीर करतो. सध्या राज्यात सर्वत्रच व्हॉट्सअप, फेसबुक नेत्यांची संख्या वाढली आहे. त्यांचा त्रास सर्वांनाच होत आहे. तरी त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे केली.

आणखी वाचा-निवडणूक रणनीती ठरवण्यासाठी भाजपची उद्या इस्लामपुरात बैठक

मंत्री केसरकर म्हणाले की, आमदार बाबर यांनी मतदारसंघात टेंभू योजनेचे पाणी आणले आहे. आता प्रत्येकाच्या शिवारात पाणी पोहोचवण्यासाठी पुढचे आमदार तेच असले पाहिजेत, यासाठी तुमची जबाबदारी आहे.

आमदार बाबर म्हणाले, मी राजकारणात आल्यापासून दुष्काळी भागातील लोकांचे कष्ट बघितले आहेत. त्यामुळे आजची गर्दी आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मी भारावून गेलो आहे. देशाच्या कोणत्या ही भागात गेलात, तरी आमच्या मतदारसंघातील गलाई बांधव भेटतात. त्यांचा उद्योग अडचणीत आहे. त्यांना सुक्ष्मलघु उद्योग म्हणून मान्यता मिळावी. आमच्या भागातील भाजीपाला, निर्यातक्षम द्राक्षे आणि डाळिंब आदी पिकांवर प्रक्रिया केंद्रे आवश्यक आहेत. तसेच आटपाडी औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणी आमदार बाबर यांनी यावेळी केली.