लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची एकमेकांना गरज असल्याने वेगळा विचार केला तर उभयतांना धोकादायक ठरु शकेल, असे मत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. सांगलीसाठी भाजपाने उसना उमेदवार घेऊन िरगणात उतरण्याची तयारी केली आहे.  या स्वार्थी राजकारणाला जनता थारा देणार नाही असेही त्यांनी सांगितले.
विरोधी पक्ष आघाडी शासनावर भ्रष्टाचाराचे चुकीचे आरोप करीत आहेत. सिंचन योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद ४० हजार कोटींची असताना ७० हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप हास्यास्पद आहे.  खोटे आरोप करुन राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना शरद पवार यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी प्रतिज्ञा पत्र सादर करावे लागले.
राज्यात विकास कामांसाठी टोल संस्कृती युती शासनानेच अमलात आणली. हा इतिहास असताना या प्रकरणी आघाडी शासनावर आरोप करणे चुकीचे असल्याचे सांगत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संख्याबळात वाढ होणार असा विश्वास व्यक्त केला.

आघाडीत वेगळा विचार उभयतांना

धोकादायक – आर. आर. पाटील

वार्ताहर, सांगली

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची एकमेकांना गरज असल्याने वेगळा विचार केला तर उभयतांना धोकादायक ठरु शकेल, असे मत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. सांगलीसाठी भाजपाने उसना उमेदवार घेऊन िरगणात उतरण्याची तयारी केली आहे.  या स्वार्थी राजकारणाला जनता थारा देणार नाही असेही त्यांनी सांगितले.

विरोधी पक्ष आघाडी शासनावर भ्रष्टाचाराचे चुकीचे आरोप करीत आहेत. सिंचन योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद ४० हजार कोटींची असताना ७० हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप हास्यास्पद आहे.  खोटे आरोप करुन राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना शरद पवार यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी प्रतिज्ञा पत्र सादर करावे लागले.

राज्यात विकास कामांसाठी टोल संस्कृती युती शासनानेच अमलात आणली. हा इतिहास असताना या प्रकरणी आघाडी शासनावर आरोप करणे चुकीचे असल्याचे सांगत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संख्याबळात वाढ होणार असा विश्वास व्यक्त केला.

 

 

 

——————–

 

 

 

 

संजय मंडलिक यांचा शिवसेनेत प्रवेश

प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व काँग्रेसचे सहयोगी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र संजय मंडलिक यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर त्यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, शिवसेनेकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेले जिल्हाप्रमुख विजय देवणे उपस्थित होते. देवणे यांनी लोकसभेसाठी जो उमेदवार देतील त्याचा प्रचार करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. यामुळे मंडलिक हे धनुष्यबाण चिन्हाचे उमेदवार असणार हे निश्चित झाले आहे.

गेल्या निवडणुकीत शरद पवार यांच्याशी काडीमोड घेत सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष म्हणून िरगणात उतरत राष्ट्रवादीचे उमेदवार युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव करत खासदारकी मिळवली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व पत्करले. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्यांनी काँग्रेस झेंडय़ाखाली लढवत जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता मिळवत पुत्र संजय मंडलिक यांना अध्यक्षपदी बसवले.

लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडाल्यावर सदाशिवराव मंडलिक यांच्यासह काँग्रेसने कोल्हापूरची जागा आपल्याकडे मागितली. त्यासाठी मंडलिक पिता-पुत्रांनी दिल्लीत हायकमांडकडे साकडे घालण्यासाठी तळ ठोकला. परंतु त्यात त्यांना यश आले नाही आणि ही जागा राष्ट्रवादीच्याच वाटय़ाला गेली. त्यानंतरही मंडलिकांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि सरतेशेवटी खासदार राजू शेट्टींच्या हातात हात घालून महायुतीत सामील होऊन राष्ट्रवादीला विरोध करण्याच्या हालचाली सुरू केल्या. आज याअंतर्गतच संजय मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश करत पुढचे पाऊल टाकले आहे.

 

 

 

—————–

 

 

 

भारत विरूध्द पाकिस्तान कुस्तीचा

महासंग्राम आज पिंगळीच्या माळावर

वार्ताहर, कराड

क्रिकेटप्रमाणे भारत विरूध्द पाकिस्तान असे युध्द कुस्ती शौकीनांना अनुभवता येणार आहे. माण तालुक्यातील पिंगळी येथे कुस्त्यांचा महासंग्राम भरवण्यात आला असून, सातारा जिल्ह्यातील या पहिल्याच आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानासाठी ८ पाकिस्तानी मल्ल येणार आहेत. उद्या रविवारी (२ मार्च) पिंगळी येथील हरणाई सूतगिरणी परिसरात कुस्ती मैदानाचे उद्घाटन राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती हरणाई सूतगिरणी व नियोजित साखर कारखान्याचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी दिली.

देशमुख म्हणाले, की सातारा जिल्ह्यात प्रथमच कुस्त्यांचे आंतरराष्ट्रीय स्पध्रेला साजेल अशी तयारी सुरू असून, दर्जेदार रोषणाई व फटाक्यांची आतषबाजीत पाहुण्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. हेलिकॉप्टर कॅमेऱ्यासह अत्याधुनिक यंत्रणा मैदानात तैनात करण्यात आली आहे असे देशमुख म्हणाले. कुस्ती क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर तयार व्हावेत, माण-खटावच्या मातीचे नाव उज्ज्वल व्हावे, तरूणांनी कुस्तीकडे वळावे यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे मैदान भरविणार आहे.

दरम्यान, पाकिस्तानी मल्ल दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. दिल्लीच्या हिंदकेसरी पहिलवान सोनू विरूध्द शेर-ए-पाकिस्तान जाहिद यांची प्रथम क्रमांकाची कुस्ती आहे. द्वितीय क्रमांकाची महाराष्ट्र केसरी समाधान घोडके विरूध्द अन्वर जमन (पाकिस्तान), तृतीय क्रमांकाची महाराष्ट्र चॅम्पियन अमोल फडतरे विरूध्द नसीम भट्ट (पाकिस्तान) चौथ्या क्रमांकाची राजेंद्र सूळ विरूध्द अली (पाकिस्तान), पाचव्या क्रमांकाची महाराष्ट्र चॅम्पियन निलेश लोखंडे विरूध्द उमर मुहम्मद पाकिस्तान, जयदीप गायकवाड विरूध्द भट मुम्मद असाद, नाना खांडेकर विरूध्द सलमान यांच्यात कुस्ती होणार आहे.

 

 

—————-

 

 

 

इचलकरंजी नगराध्यक्षपदी बिस्मिला मुजावर

प्रतिनिधी, कोल्हापूर

इचलकरंजी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शनिवारी बिस्मिला अहमद मुजावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. विरोधी शहर विकास आघाडीनेही नगराध्यक्षपदासाठी प्रथमच मुस्लीम समाजातील महिलेला संधी दिल्याबद्दल निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला होता. मुजावर यांच्या निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला.

सुमन पोवार यांचा साडेचार महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांनी गत आठवडय़ात जिल्हाधिकारी माने यांचेकडे राजीनामा सादर केला. तो मंजूर करुन जिल्हाधिकाऱ्यानी नूतन नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम घोषित केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम वेळेपर्यंत सत्तारुढ काँग्रेसकडून बिस्मिला मुजावर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध निश्चित झाली होती. त्यामुळे आजच्या विशेष सभेत केवळ घोषणेची औपचारिकता बाकी राहिली होती.

निवडीनंतर अश्विनी जिरंगे यांच्या हस्ते मुजावर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपनगराध्यक्ष संजय कांबळे, गटनेते बाळासाहेब कलागते, माजी नगराध्यक्ष किशोरी आवाडे, रत्नप्रभा भागवत व सहकारी नगरसेविकांनी त्यांचे अभिनंदन केले. निवडीनंतर शहरातील प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढण्यात आली.

——

फोटो – १ बिस्मिला मुजावर

 

 

 

———————

 

 

 

 

बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक

सोलापुरात उभारण्याचा निर्णय

(पालिका सभेत शिक्कामोर्तब)

प्रतिनिधी, सोलापूर

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्यास सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मान्यता देण्यात आली. त्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात २५ लाखांचा निधी राखून ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील शिवसेना भवनाच्या धर्तीवर सोलापुरात हे स्मारक उभारले जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरातील विजापूर रस्त्यावर रेवणसिध्द मंदिराजवळ महानगरपालिकेच्या मालकीच्या सुमारे चार हजार चौरस मीटर भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शिवसैनिकांना आपलेसेकरण्यात पालिकेतील सत्ताधारी काँग्रेस आघाडी यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. पालिका सभेत सभागृहनेते महेश कोठे यांच्यासह विरोधी पक्षनेते कृष्णाहरी दुस्सा, राष्ट्रवादीचे गटनेते दिलीप कोल्हे, शिवसेनेचे गटनेते भीमाशंकर म्हेत्रे, भाजपचे जगदीश पाटील, सुरेश पाटील, शिवसेनेचे मनोज शेजवाल आदींनी याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. कला, क्रीडा, संगीत, साहित्य, समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रांशी त्यांचे अतूट नाते होते. आपल्या कुंचल्यांनी भल्याभल्यांची भंबेरी उडविणारे, आपल्या दमदार नेतृत्वाने कणखर व प्रखर भूमिकेने गेली चार दशके मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य करून मराठी अस्मितेची जपणूक करण्याची भूमिका बाळासाहेबांनी शेवटपर्यंत पार पाडली. मराठी माणसाचा विकास, महाराष्ट्राचा सर्वागीण विकास करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि मराठी मनाचा आवाज बुलंद केला. अशा प्रेरणादायी नेतृत्वाचे स्मरण कायम स्वरूपी राहावे म्हणून शहरात मुंबईतील शिवसेना भवनाच्या धर्तीवर भव्य स्मारक असावे, असे प्रस्तावात म्हटले आहे. वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका, अ‍ॅम्फी थिएटर, कलादालन अशा विविध घटकांनी युक्त असे भव्य स्मारक उभारताना जागा संपादनाची अडचण सोडविण्यासाठी आयुक्तांनी कार्यवाही करावी, असे ठरावात नमूद करण्यात आले आहे.

ठाकरे याच्या स्मारक उभारणीची घोषणा दीड वर्षांपूर्वी झाली होती. त्याबाबतचा ठरावही पालिका सभेत मंजूर झाला होता. परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे यांच्या स्मारकाचा विषय पुन्हा सभागृहात येऊन तो झटपट मंजूरही झाला. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांत समाधानाचे वातावरण दिसून येते. मात्र या मुद्दय़ावर लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक उभारण्यावरून श्रेयवादाचे राजकारण होण्याची शक्यता वर्तविली जात असून यात सामान्य शिवसैनिकांना आपलेसेकरून घेण्यात काँग्रेसची मंडळी यशस्वी होतील, असा कयास व्यक्त होत आहे.

 

 

 

—————-

 

 

 

गर्भलिंग निदानाबद्दल

करमाळ्यात डॉक्टरांना शिक्षा

प्रतिनिधी, सोलापूर

प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान व चिकित्सा प्रतिबंधक कायद्याखाली करमाळ्यातील कृष्णा हॉस्पिटलच्या डॉ. कविता कांबळे यांना करमाळा न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ऑगस्ट २०१० मध्ये करमाळ्यात डॉ. कविता कांबळे यांना स्टिंग ऑपरेशन करून पकडण्यात आले असता त्यावर लोकसत्ताने पाठपुरावा केला होता.

सातारच्या दलित महिला अत्याचार संघटनेच्या लेक लाडकीअभियनांतर्गत अ‍ॅड. वर्षां देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी करमाळ्यातील डॉ. कविता कांबळे यांच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान व चिकित्सा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने शासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले होते. त्यानुसार सापळा रचून २४ ऑगस्ट २०१० रोजी अ‍ॅड. वर्षां देशपांडे यांच्या सहकारी कार्यकर्त्यां अ‍ॅड. शैलजा जाधव, माया पवार व प्रेरणा भिलारे यांनी करमाळ्यात जाऊन डॉ. कविता कांबळे यांची भेट घेतली. यात प्रेरणा भिलारे या साडेचार महिने गरोदर असलेल्या महिलेला बनावट रुग्ण म्हणून उभे केले असता डॉ. कविता कांबळे हिने पैसे घेऊन प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान केले. त्यावेळी कुर्डूवाडीच्या तत्कालीन प्रांत विद्युत वरखेडकर यांनी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकासमवेत डॉ. कांबळे यांच्या कृष्णा हॉस्पिटलवर धाड  टाकून तेथील सोनोग्राफी केंद्राची तपासणी केली असता गर्भलिंग चिकित्सा झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, याप्रकरणी डॉ.कांबळे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल होताच त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असता आजारपणाचे कारण पुढे करून सोलापूरच्या छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात अनेक दिवस उपचाराच्या नावाखाली आराम केला.  यासंदर्भात लोकसत्ताने वेळोवेळी पाठपुरावा केला असता अखेर डॉ. कविता कांबळे यांना आठवडाभर प्रत्यक्ष न्यायालयीन कोठडीची हवा खाणे भाग पडले होते. तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले असता करमाळा न्यायदंडाधिकारी जे.जी. पवार यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. यात सरकारतर्फे तत्कालीन प्रांत विद्युत वरखेडकर यांच्यासह डॉ. चंद्रकांत वीर, डॉ. प्रशांत करंजकर, तसेच मूळ तक्रारदार प्रेरणा भिलारे, माया पवार यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. सरकारतर्फे अ‍ॅड. राजाराम कोळेकर व अ‍ॅड. राजेश दिवाण यांनी युक्तिवाद केला. तर आरोपीतर्फे अ‍ॅड. एस. के. जैन, अ‍ॅड. केवटे व अ‍ॅड. कमलाकर वीर यांनी बाजू मांडली.

 

 

 

——————-

 

 

 

कोल्हापुरात जनता बाजारला २०  वष्रे मुदतवाढ

(खासगी तत्त्वावर व्यापारी संकुल बांधण्याचा प्रस्ताव)

प्रतिनिधी, कोल्हापूर

अर्थपूर्ण व्यवहाराची किनार असलेल्या जनता बाजारला २०  वष्रे मुदतवाढ देण्याचा आणि पाटणकर हायस्कूल येथे खासगी तत्त्वावर व्यापारी संकुल बांधण्याच्या प्रस्ताव शनिवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा करून मंजूर करण्यात आला. तर जनता बाजारच्या मुदतवाढीचा प्रस्ताव विरोधकांनी मंजूर नसल्याचे सांगितले. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सुनीता राऊत होत्या.

देशभक्त रत्नाप्पा कुंभार जनता सेन्ट्रल कॉ-ऑप. कंझ्यूमर स्टोअर्स यांना मागील मुदतीस जोडून पुढे  मुदतवाढ देण्याबाबतचा फेरप्रस्तव आज जोरदार चच्रेअंती उपसूचनेसह मंजूर करण्यात आला. यावेळी झालेल्या चच्रेत सुरवातीलाच संभाजी जाधव यांनी जनता बझार अस्तितवात आहे का? ८१ ब प्रमाणे कारवाई का केली नाही? असे प्रश्न उपस्थित केले. नगरसेवक प्रा. जयंत पाटील आणि नगरसेवक आर. डी. पाटील यांनी भाडे दुप्पट किवा तिप्पट करण्यामागे काय लॉजिक आहे?, जनता बझारमध्ये कायद्याने पोटकुळ कसे काय ठेवले?, जनता बाजारच्या मूल्यांकनाचा प्रस्ताव सभेपुढे का आणला नाही? असा सवाल प्रशासनाला विचारला. यावर प्रशासनाने ही बाब न्यायप्रविष्ठ असून न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ८१ ब प्रमाणे कारवाईची नोटीस बजावली असून इमारत सील केल्याची माहिती इस्टेट ऑफिसर संजय भोसले यांनी सभागृहाला दिली. ३५ मिनिटे चाललेल्या प्रदीर्घ चच्रेनंतर मुदतवाढीचा प्रस्ताव उपसूचनेसह मंजूर करण्यात आला.

गणपूर्ती अभावी शुक्रवारी तहकूब केलेली सभा आज घेण्यात आली. या वेळी अनेक प्रस्ताव पार्टी मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे मंजूर करण्यात आले. सुरुवातीला शहरातील विविध मार्केट मधील गाळे रेडीरेकनर प्रमाणे भाडय़ाने देण्याबाबत विषय चच्रेसाठी आला. यावेळी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे आणि जितेंद्र सलगर यांनी महापालिकेच्या गाळ्यांची दूरवस्था स्पष्ट करत रेडीरेकनर प्रमाणे भाडय़ाबाबत जोरदार चर्चा करत प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. शहरातील सर्वच मार्केटची झोनवाईज कारवाई करण्याची मागणी सलगर यांनी केली तर मटण मार्केट मधील चिकन, मटन, मासे विक्री करणाऱ्या दुकानदारांना ७ दिवसांची मुदतीची नोटीस बजावून कारवाई करण्यात येणार आहे असे मिळकत अधिकारी संजय भोसले यांनी सभागृहाला सांगितले. रेडीरेकनर प्रमाणे भाडय़ाने देण्याबाबत विषय हा उपसूचनेसह मंजूर करण्यात आला.केएमटीच्या विभागात पूर्ण वेळ अधिकारी नेमण्याची सूचना नगरसेवकांनी केली. तर पाटणकर हायस्कूल येथे खासगी तत्वावर व्यापारी संकुल बांधण्याच्या प्रस्तावावर जोरदार चर्चा करून विषय उपसूचनेसह मंजूर करण्यात आला.

 

 

/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:”Table Normal”;
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-parent:””;
mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt;
mso-para-margin:0in;
mso-para-margin-bottom:.0001pt;
mso-pagination:widow-orphan;
font-size:10.0pt;
font-family:”Times New Roman”;
mso-ansi-language:#0400;
mso-fareast-language:#0400;
mso-bidi-language:#0400;}

Story img Loader