सांगली : सव्वा लाखाची लाच घेणार्‍या महापालिकेच्या अग्निशमन अधिकार्‍याच्या घरझडतीमध्ये लाच लुचपत विभागाच्या पथकाला सात लाखांची रोकड आढळून आली. अग्निसुरक्षा यंत्रणा उभी करणार्‍या कंपनीकडून सव्वा लाख रुपयांची लाच घेत असताना या अधिकार्‍याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री कार्यालयात अटक केली.

याबाबत माहिती अशी, महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी विजय आनंदराव पवार (वय ५० रा. संभाजीनगर, सांगलीवाडी) यांना कार्यालयात सव्वा लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. अग्निसुरक्षा यंत्रणा बसविणार्‍या कंपनीला ना हरकत दाखला देण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच पवार याने मागितली होती. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा लावला होता.

Navi Mumbai Municipal Corporation Encroachment Department takes action against illegal constructions in Nerul and Ghansoli
नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
ठाणे पोलिसांनी नोंदविला माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब; कथित गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन खंडणी वसूली प्रकरण
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
pune pmc On first day of Sarvankash Swachhta 24 tons of garbage and billboards removed
महापालिका आयुक्तांचा आदेश आणि पहिल्याच दिवशी झाले इतके काम ! महापालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम, १६ टन राडारोडा, २४ टन कचराही उचलला

हेही वाचा – “समृद्धी महामार्ग बांधला राज्याने, लोक अपघातांबाबत प्रश्न विचारतात मला”; वाचा, गडकरी नेमके काय म्हणाले

लाचखोर अधिकारी पवार याला रंगेहात अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या सांगलीवाडीतील निवासाची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी त्याच्या घरातून ७ लाख १ हजार ६०० रुपयांंची रोकड मिळाली असून ही रोकड जप्त करण्यात आली असल्याचे उपअधिक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. दरम्यान पवार यांना न्यायालयाने दि. ३० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश बुधवारी दिले.

Story img Loader