-संदीप आचार्य, लोकसत्ता

भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि सामान्य नागरिकांना कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून रात्री उशीरा कामावरून घरी परतणाऱ्या लोकांपर्यंत सर्वांमध्ये भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केली आहे. राज्यात जानेवारी ते जुलै २३ अखेरीस तीन लाख ४९ हजार २९७ लोकांना भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनांची नोंद आहे. मुंबईत याच काळात तब्बल ४१ हजार ८२८ लोकांना कुत्र्याने चावा घेतला आहे.

अनेकदा पहाटे व रात्री हल्ला करणाऱ्या या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करायचा, हा एक प्रश्न बनला आहे. राज्यात २०१७ पासून आतापर्यंत तब्बल ३५ लाख ४९ हजार ६१६ लोकांना कुत्रे चावले असून, यात रेबीजमुळे तसेच कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकजण मरण पावले आहेत. चालू वर्षातील जूनपर्यंत रेबीजमुळे १७ जणांचा मृत्यू झाला आहे. एमएमआर विभागात कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये २६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
Wildlife scientists and animal researchers claim about the golden fox thane news
मानवी वस्तीत येणारे सोनेरी कोल्हे निवासीच! वन्यजीव शास्त्रज्ञ, प्राणी अभ्यासकांचा दावा
gondia tiger death loksatta
गोंदिया : ‘टी १४ वाघिनी’च्या बछड्याच्या मृत्यू, ‘इन्फेक्शन’, निष्काळजीपणा की…
Makar Sankranti motorcyclist died after nylon manja got stuck in his neck
नाशिकमध्ये नायलाॅन मांजामुळे युवकाचा मृत्यू
Tiger death , Kohka-Bhanpur route, tiger gondia ,
राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू
Video About Vadhvan Port
Vadhvan Port : वाढवण बंदर का महत्त्वाचं आहे? पाच वैशिष्ट्ये कुठली? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सखोल विश्लेषण

“दररोज २१६१ जणांना कुत्र्यांचा चावा”

राज्यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून त्यांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, राज्यात दर तासाला ९० नागरिकांना कुत्र्यांकडून चावा घेतला जात आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबई आणि ठाण्यात कुत्र्याने चावा घेण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत राज्यात तीन लाख ८९ हजार ११० जणांचा कुत्र्याने चावा घेतला. या आकडेवारीनुसार दररोज २१६१ जणांना कुत्र्याने चावा घेतल्याची नोंद होत आहे. यामध्ये मुंबईत ४१ हजार ८२८ तर ठाण्यात ३६ हजार ६०, पालघरमध्ये १३ हजार ३०१ आणि रायगडमध्ये १३ हजार ५९८ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. कोल्हापूर येथे ३४ हजार ८९, अहमदनगर ३३ हजार ३९२, सोलापूर २१ हजार ३५८ कुत्रे चावण्याच्या घटनांची नोंद आहे.

हेही वाचा : ‘आरोग्य संचालक शहर’ हे पद दोन वर्षांनंतरही कागदावरच!, शहरी आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष…

“रेबीजची लक्षणे २ ते १२ आठवड्यात दिसून येतात”

राज्यात २०२१ मध्ये चार लाख ७७ हजार १३३ आणि २०२२ मध्ये चार लाख ४३ हजार ८५५ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मुंबईत कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत २०२१ मध्ये ६१ हजार ३३२ आणि २०२२ मध्ये ७८ हजार ७५६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण झाले नसल्यास त्यांच्याशी जवळीक साधणे घातक ठरू शकते; मग तो पाळीव प्राणी असो वा भटका कुत्रा. रेबीज हा एक प्राणघातक विषाणू आहे. जो कुत्रा, मांजर, माकडे आणि इतर प्राणी चावल्याने आणि चाटल्याने मानवांमध्ये पसरतो. हा विषाणू त्यांच्या लाळेमध्ये असतो. रेबीजची काही लक्षणे २ ते १२ आठवड्यात दिसून येतात. ज्यामध्ये रुग्णाची क्रियाशीलता आणि आक्रमकता वाढते, अस्वस्थता, चक्कर येणे, स्मृतिभ्रंश, स्नायू मुरगळणे, ताप, हृदयाचे ठोके वाढणे, जास्त लाळ गळणे आणि पाण्याची भीती वाटणे यांसारखी प्रमुख लक्षणे आहेत.

“१९९३ पर्यंत भटक्या कुत्र्यांना मारलं जातं होतं, पण…”

मुंबईच्या सर्वच भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून तो थांबविण्यासाठी कुत्र्यांना विजेचा शॉक देऊन ठार मारण्याची पद्धत पुन्हा सुरू करण्याची मागणी काही वर्षांपूर्वी मुंबई महापालिका सभागृहात करण्यात आली होती. कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्याची पालिकेची उपाययोजना तोकडी पडत असल्याने वेळोवेळी कुत्र्यांचा बंदोबस्त करा वा पूर्वीप्रमाणे भटक्या कुत्र्यांना मारण्यात यावे ही मागणी अनेकदा केली गेली. पालिका कायदा १८८८ मध्ये भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याची तरतूद असून १९९३पर्यंत भटक्या कुत्र्यांना मारले जात होते. मात्र, प्राणीमित्र संघटनांनी त्याविरोधात केलेल्या याचिकेनंतर न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या मारण्यावर बंदी घातली आहे. याच्या परिणामी राज्यात व मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या वेगाने वाढत आहे. मुंबईत २०१४ मध्ये कुत्र्यांची संख्या मोजण्यात आली होती तेव्हा ९५ हजार भटक्या कुत्र्यांची नोंद पालिकेने केली होती. आज मुंबईत जवळपास दोन लाख भटके कुत्रे असतील, असा अंदाज पालिका सूत्रांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : राज्यातील धर्मदाय रुग्णालयातील राखीव खाटांची माहिती मिळणार एका ‘क्लिक’वर!

“दरवर्षी मुंबईतील सुमारे एक लाख भटक्या कुत्र्यांचे रेबीज लसीकरण”

या पार्श्वभूमीवर मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणासाठी तसेच ‘रेबीजमुक्त मुंबई’ करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका आणि मिशन रेबिज तसेच वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस (डब्ल्यूव्हीएस) या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार, दरवर्षी मुंबईतील सुमारे एक लाख भटक्या कुत्र्यांचे रेबीज लसीकरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी दोन्हीही संस्था नि:शुल्क सेवा देणार आहेत.

“कुत्र्यांचं लसीकरण करण्यासाठी ४५० ते ६०० जणांचं मनुष्यबळ लागणार”

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग तसेच मत्स्यपालन आणि पशूसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वर्ष २०३० पर्यंत कुत्र्यांपासून होणाऱ्या रेबीज रोगाच्या निर्मुलनासाठी राष्ट्रीय कृती आराखडा निश्चित केला आहे. मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण आणि लसीकरणासाठी मिशन रेबीजशी संबंधीत असलेले विदेशातील तज्ञ स्वयंसेवक मुंबईत येतील. यामध्ये हाताने कुत्री पकडणाऱ्या १०० चमू, जाळीच्या साहाय्याने कुत्री पकडणाऱ्या २० चमूंचा समावेश आहे. मुंबईतील एक लाख भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यासाठी सुमारे ४५० ते ६०० मनुष्यबळ लागणार आहे. या मनुष्यबळांचा पुरवठा करण्यासाठी विविध महाविद्यालये तसेच स्वयंसेवी संस्थाचीही मदत घेतली जाणार आहे. तथापि कुत्रे चावण्याच्या वाढत्या घटना तसेच कुत्र्यांकडून होणारे हल्ले रोखणार कसे हा कळीचा मुद्दा आहे.

Story img Loader