भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी ५ वर्षांच्या काळात लोकसभेत वैयक्तिक केवळ ७ प्रश्न विचारले. त्यात मतदारसंघातील एकच प्रश्न होता. एकूण विचारण्यात आलेल्या ११३ प्रश्नांपकी केवळ १६ प्रश्न चच्रेला आले. माहितीच्या अधिकारातून ही माहिती मिळाल्याचे भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे अॅड. अजित देशमुख यांनी सांगितले. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या कामाचे दरवर्षी सामाजिक लेखापरीक्षण व्हावे, अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली.
अॅड. देशमुख यांनी काही महिन्यांपूर्वी मुंडे यांच्या लोकसभेतील कामकाजाबाबत माहितीच्या अधिकारात अर्ज केला होता. निवडणुका संपल्यानंतर लोकसभा सचिवालयाकडून ही माहिती त्यांना प्राप्त झाली. यात मुंडे यांनी ५ वर्षांच्या काळात लोकसभेत एकूण ११३ प्रश्न विचारले. पकी केवळ १६ प्रश्न प्रत्यक्षात सभागृहात चच्रेला आले. यावरून वर्षांत होणाऱ्या ३ अधिवेशनांच्या काळात केवळ २२ प्रश्न विचारले गेले आहेत. यात चच्रेला आलेल्या १६ पकी ८ प्रश्न इतर खासदारांनी, तर मुंडे यांनी वैयक्तिक केवळ ७ प्रश्न विचारले. त्यात स्थानिक मतदारसंघातील एकच प्रश्न होता, असे कळविण्यात आले. मात्र, हा प्रश्न कोणता हे स्पष्ट केले नाही.

Story img Loader