धाराशिव : ठेकेदाराने रस्त्याचे काम केल्यानंतर मोजमाप पुस्तिकेवर स्वाक्षरी करण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी शाखा अभियंत्याला सात वर्षांचा कारावास झाला आहे. येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी लाचखोर अभियंता शंकर विश्वनाथ महाजन याला चार वर्षे कारावास आणि ५० हजार रूपयांचा दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.
येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेला शाखा अभियंता शंकर महाजन याने १२ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. धाराशिव तालुक्यातील गडदेवधरी परिसरात रस्त्याचे काम एका ठेकेदाराने केले होते. त्या रस्त्याच्या मोजमाप पुस्तिकेवर स्वाक्षरी करण्यासाठी महाजन यांनी १२ हजार रूपये लाच मागीतली. पंचासमक्ष १० हजार रूपयांची लाच स्वीकारली.
२०१५ साली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नऊ वर्षानंतर शाखा अभियंता शंकर महाजन याच्या विरोधात निकाल लागला आहे. सात वर्षे कारावास, ५० हजार रूपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कारावास, अशी शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली आहे.