कल्पेश भोईर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वसई पूर्व भागातील विहिरी, तलाव आटले; रहिवाशांची पाण्यासाठी वणवण; पालिकेकडून टँकरने पुरवठा

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वसई पूर्वेकडील ग्रामीण भागात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. परिसरातील विहिरी, तलाव आटले असून रहिवाशांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. महापालिकेने टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.

वसई-विरार महापालिका हद्दीतील शहरी भागात सूर्या पाणी प्रकल्पातून मुबलक पाणी येत असले तरी पूर्वेकडील गावांना विहिरी, तलावे आणि बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच या भागातील विहिरी आटू लागल्याने भयंकर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वसई पूर्वेतील भागात कामण, चिंचोटी, कोल्ही, देवदल, सागपाडा या परिसरात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी या गावांतील रहिवाशांची वणवण सुरू आहे. या परिसरात असलेल्या आजूबाजूच्या गावांनाही पाणीटंचाईच्या झळा पोहचू लागल्याने संतप्त झालेल्या रहिवाशांनी महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येथील गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार होता. मात्र अजूनही त्याचेही काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले असल्याने अजूनही जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पाणीपुरवठाही होऊ  शकला नाही. सध्या येथील नागरिकांना बोअरवेल, विहिरी, तलाव येथीलच पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. मात्र पाण्याचे हे स्रोत आटले असल्याने जलसंकट निर्माण झाले आहे. विहिरींमधील पाण्याची पातळी खूपच खालावली असून बोअरवेलद्वारेही पाणी येत नसल्याचे चित्र आहे.

टँकरवर अवलंबून

विरार पूर्वेकडील पापडखिंड धरणातून दररोज एक दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र हे धरण पूर्णपणे आटले आहे. पाणीटंचाई असल्याने गावातील रहिवाशांना आता टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. टँकरसाठी ग्रामस्थांना पैसे मोजावे लागत आहेत. हे पाणी  दूषीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आंदोलनाचा इशारा

या भागातील पाणीटंचाई अधिक तीव्र होत असल्याने यावर लवकरात लवकर उपाययोजना करून सर्व सामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. जर यावर तोडगा न निघाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

वसई-विरार महापालिकेच्या वतीने जिथे पाण्याची कमतरता आहे. तिथे बोअरवेल मारून देणे, त्या भागात नादुरुस्त असलेल्या बोअरवेल दुरुस्त करून देणे. टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करणे ही कामे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सुरू आहेत. महापालिकेच्या वतीने वेळोवेळी पाण्यासंदर्भात उपाययोजना केल्या जातात.

– माधव जवादे, शहर अभियंता, महापालिका